Chandwad Crime : चांदवडमध्ये संतापजनक घटना! 8 वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न; परिसरात खळबळ

नाशिकच्या चांदवड शहरातील एका भागात एका 8 वर्षांच्या अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Chandwad Crime : चांदवडमध्ये संतापजनक घटना! 8 वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न; परिसरात खळबळ
Chandwad Crime

नाशिकच्या चांदवड शहरातील एका भागात एका 8 वर्षांच्या अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 10:00 ते 10:30 वाजेच्या सुमारास येथील एका टपरीच्या पाठीमागे ही घटना घडली. आघार ता. मालेगाव येथील एकाने 8 वर्षांच्या बालकाला आमिष दाखवून टपरीच्या पाठीमागे नेले आणि त्याच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा- LPU Campus Protest: विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याच्या अफवेमुळे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रचंड तोडफोड; संतापलेल्या विद्यार्थ्यांनी महामार्ग रोखला

​या घटनेबाबत पीडित बालकाच्या आईने पहाटे 3:34 वाजता चांदवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुं.र.नं. 392/2026 अन्वये बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (POCSO) 2012 चे कलम 4, 8 व 12 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटना घडल्यानंतर मनमाड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. रोशन पंडित आणि चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या घटनास्थळी व परिसरात शांतता असून कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भानुदास बी. नर्हे करत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number