Accident News: भाजप आमदाराच्या मुलाचा प्रताप; भरधाव कार चालवत 5 जणांना चिरडलं, जखमींवर उपचार सुरू

या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर जखमींवर उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Accident News: भाजप आमदाराच्या मुलाचा प्रताप; भरधाव कार चालवत 5 जणांना चिरडलं, जखमींवर उपचार सुरू

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात भाजप आमदाराच्या मुलाकडून वेगाने वाहन चालवताना मोठा अपघात घडला आहे. पिछोर मतदारसंघातील भाजप आमदार प्रीतम लोधी यांचा मुलगा दिनेश लोधी याने भरधाव थार वाहन चालवत 5 जणांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तीन मजूर आणि दोन महिला जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील करेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सकाळच्या सुमारास संजय परिहार, आशीष परिहार आणि अंशुल परिहार हे तिघे मजुरीसाठी मोटारसायकलवरून जात होते. त्यांच्या पुढे सीता वर्मा आणि पूजा सोनी या दोन महिला पायी चालत होत्या. त्याच वेळी मागून आलेल्या भरधाव थारने आधी मोटारसायकलला आणि त्यानंतर पुढे चालणाऱ्या महिलांना धडक दिली. या अपघातात सर्व जण रस्त्यावर कोसळले.

जखमींनी आरोप केला आहे की, थार वाहन दिनेश लोधी चालवत होता. वाहनावर पुढे ‘प्रीतम लोधी’ आणि मागे ‘MLA’ असे लिहिलेले होते. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी दिनेश लोधीला जाब विचारला असता, त्याने “मी हॉर्न आणि सायरन वाजवला होता, हे लोक बाजूला सरले नाहीत” असे उत्तर दिले आहे. 

हेही वाचा: EPFO New Form: PF खातेधारकांनो लक्ष द्या! ‘फॉर्म 15G आणि 15H बंद; आयकर टाळण्यासाठी आता भरावा लागणार ‘हा’ नवीन फॉर्म

या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर जखमींवर उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींना डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे, अपघात घडूनही पीडितांनाच दोष देण्याचा प्रयत्न केल्याने दिनेश लोधीवर आणखी टीका होत आहे.

दरम्यान, संजय परिहार यांनी करेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दिनेश लोधीविरोधात बेफिकीर आणि निष्काळजी वाहनचालकाचे कलम लावून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून अपघातामागील नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बेफाम वाहनचालकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: Jitendra Shelke Accident: समृद्धी महामार्गावर कार थेट कंटेनरखाली घुसली; अशोक खरातच्या विश्वासू सहकाऱ्याचा भीषण अपघातात मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number