सचिन वाझेचा तुरुंगातील मुक्काम वाढला; मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन आदेशाला 7 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम स्थगिती

विशेष सीबीआय न्यायालयाने वाझेला मंगळवारी मंजूर केलेल्या जामीन आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने 7 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे.

सचिन वाझेचा तुरुंगातील मुक्काम वाढला; मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन आदेशाला 7 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम स्थगिती
सचिन वाझेचा मुक्काम जेलमध्येच, जामीन अर्जाला स्थगिती

Sachin Waze Bail Stay: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवणे आणि व्यावसायिक मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात मुख्य आरोपी असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने वाझेला मंगळवारी मंजूर केलेल्या जामीन आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने 7 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. तसेच या निर्णयाची माहिती तात्काळ कारागृह आणि राज्य प्रशासनाला देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

‘एनआयए’चा खंडपीठासमोर जोरदार युक्तिवाद

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी वाझेला जामीन मंजूर करताना लावलेला तर्क अत्यंत चुकीचा असल्याचा युक्तिवाद ‘एनआयए’तर्फे (राष्ट्रीय तपास संस्था) अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी केला. जिलेटिन कांड्या स्फोटकांच्या श्रेणीतच येतात आणि या घटनेमुळे अंबानी कुटुंबात दहशत निर्माण झाली होती, हे स्पष्ट करण्यासाठी सुरक्षा रक्षकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. परंतु, विशेष न्यायालयाने हे कृत्य दहशतवादाच्या व्याख्येत मोडत नसल्याचे सांगत ‘युएपीए’ कायद्याच्या कठोर अटी लागू होत नसल्याचे चुकीचे निरीक्षण नोंदवले, असा दावा ‘एनआयए’ने न्यायालयात केला.

हेही वाचा – हॉटेलच्या खोलीत महिलेचा संशयास्पद मृत्यू; मध्यरात्रीच्या वादानंतर जोडीदार फरार, पडद्याच्या रॉडने वाढवला संशय

उच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती लागू

सुनावणीदरम्यान सचिन वाझेचे वकील न्यायालयात उपस्थित नव्हते. मात्र, ‘एनआयए’ने त्यांना सुनावणीच्या वेळेची पूर्ण कल्पना फोनद्वारे दिल्याचे स्पष्ट केले. दोन्ही बाजूंचे गांभीर्य लक्षात घेत उच्च न्यायालयाने जामीन आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली. या निर्णयामुळे सचिन वाझेचा तुरुंगातील मुक्काम तूर्तास वाढला असून त्याच्या अडचणींमध्ये अधिक भर पडली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number