‘तुमचे फॅन आहोत…तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे’; म्हणत मारेकऱ्यांचा उद्योजक राणा सूर्यवंशींवर कोयत्याने हल्ला

बारामतीच्या विमानतळ परिसरात राणा शिपिंग कार्पोरेशनचे मालक उद्योगपती राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यात आला.
businessman rana suryavanshi
businessman rana suryavanshi

बारामती : बारामतीच्या विमानतळ परिसरात राणा शिपिंग कार्पोरेशनचे मालक उद्योगपती राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये राणा सूर्यवंशी यांच्या खांद्यावर कोयत्याने वार झाले असून पाच ते सहा इंच खोल जखम झाली आहे. या घटनेनंतर बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून स्थानिक गुन्हे शाखेसह फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. या हल्ल्याचा सर्व बाजूने तपास केला जात आहे. स्कुटीवरून आलेल्या दोघांनी चेहऱ्याला मास्क बांधलं होतं आणि आम्ही तुमचे फॅन आहोत, आम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, असं राणा सूर्यवंशी यांना सांगितलं. याचवेळी फुलांचा बुके देत असताना कोणत्या राणा सूर्यवंशी यांच्या हातावर वार केल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. राणा सूर्यवंशी हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त गोजुबाबी गावाच्या हद्दीत रेल्वे ब्रिजच्या बाजूला आले होते. त्यांच्यासोबत शासनाने दिलेली सिक्युरिटी नव्हती, याच दरम्यान ही घटना घडली आहे.

हेही वाचा : दुर्दैवी घटना! जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; 3 तरुणांचा जागीच मृत्यू

सध्या राणा सूर्यवंशी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार केले जात आहेत. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू असून बारामती तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी दिली. या ठिकाणी गोळीबार झाला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, आम्ही घटनास्थळ तपासले असून त्या ठिकाणी काहीही सापडले नाही, असे पोलिसांनी सांगितलं आहे. प्रत्यक्षदर्शीशी आम्ही चर्चा केली असून त्यांनी मोठा आवाज झाला, एवढेच सांगितलं. त्यावरून गोळीबार झाला हे स्पष्ट म्हणता येणार नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version