दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शाळेच्या प्राचार्याकडून अत्याचार; लातूरातील आदर्श शैक्षणिक संकुलाच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला शाळेच्या प्राचार्यानेच जबरदस्तीने निर्वस्त्र करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात समोर आली आहे.

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शाळेच्या प्राचार्याकडून अत्याचार; लातूरातील आदर्श शैक्षणिक संकुलाच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल
latur crime

अजय घोडके, प्रतिनिधी

लातूर : दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला शाळेच्या प्राचार्यानेच जबरदस्तीने निर्वस्त्र करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात समोर आली आहे. या प्रकरणी आदर्श शैक्षणिक संकुलाचा प्राचार्य बशीर शेखवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : पैठणमध्ये एसटी बस-दुचाकीची भीषण धडक; दोन जणांसह अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

लातूर शहरातील बार्शी रोडवर असलेल्या आदर्श शैक्षणिक संकुलात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्राचार्य बशीर शेख (वय 45 वर्ष) याने कार्यालयात बोलावून तिला जबरदस्ती निर्वस्त्र करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 20 सप्टेंबर 2026 रोजी लातूर शहरात समोर आली होती. परंतु आरोपी बशीर शेख हा एका मोठ्या राजकीय पक्षाचा पुढारी असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास लातूरच्या पोलिसांकडून दिरंगाई केली जात होती. मात्र राजकीय दबाव वाढल्याने तब्बल 15 दिवसानंतर लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 687/2026 कलम 74, 76 351(2), BNS L सह कलम 8, 12 पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी बशीर शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अद्याप फरार आहे. या प्रकरणातील पीडित मुलीला धमकावण्याचा प्रयत्नही आरोपी बशीर शेखकडून करण्यात आला असून त्याची एक ‘ऑडिओ क्लिप’ पीडित मुलीच्या नातेवाईकांकडे असल्याची खात्रीशीर माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘जय महाराष्ट्र’ला दिली असून आरोपी बशीर शेखने यापूर्वी किती अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. याचा शोध लातूर पोलिसांकडून घेतला जात असल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी सांगितले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number