पैठणमध्ये एसटी बस-दुचाकीची भीषण धडक; दोन जणांसह अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

पैठण शहरातील बडजाते हॉस्पिटलजवळ रविवारी दुपारी एसटी बस आणि दुचाकीची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांसह अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

पैठणमध्ये एसटी बस-दुचाकीची भीषण धडक; दोन जणांसह अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Paithan Accident

पैठण शहरातील बडजाते हॉस्पिटलजवळ रविवारी दुपारी एसटी बस आणि दुचाकीची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांसह अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवगावकडून पैठणच्या दिशेने येणारी एमएच-06 बीडब्ल्यू-4369 क्रमांकाची एसटी बस बडजाते हॉस्पिटलजवळ आली असताना एमएच-20 जीए-2979 क्रमांकाच्या दुचाकीला धडकली. धडक एवढी भीषण होती की, या दुर्घटनेत अशोक रमेश भालेराव (वय 35, रा. अंतरवाली राठी, जि. जालना) आणि कृष्णा अशोक गायकवाड (वय 25, रा. राक्षी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांच्यासह अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- येवल्यात ट्रकला आयशर टेम्पोची जोरदार धडक, ट्रकसह ओमनी कारही फरफटत गेली; अपघातात एकाचा मृत्यू, एक जण जखमी

घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा पंचनामा केला. अपघातग्रस्त एसटी बस पोलिसांनी ताब्यात घेतली असून ती पैठण पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली आहे. दरम्यान, अपघातानंतर बडजाते हॉस्पिटल परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बस आणि दुचाकीची धडक नेमकी कोणत्या परिस्थितीत झाली, तसेच अपघातास कारणीभूत ठरलेली परिस्थिती कोणती, याचा तपास पैठण पोलीस करीत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number