येवल्यात ट्रकला आयशर टेम्पोची जोरदार धडक, ट्रकसह ओमनी कारही फरफटत गेली; अपघातात एकाचा मृत्यू, एक जण जखमी

येवला शहरात आयशर टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

येवल्यात ट्रकला आयशर टेम्पोची जोरदार धडक, ट्रकसह ओमनी कारही फरफटत गेली; अपघातात एकाचा मृत्यू, एक जण जखमी
yeola accident

येवला : येवला शहरातील लक्ष्माई माता ते नागड दरवाजा रोडवरील पिंजर गल्ली परिसरात आयशर टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की उभा असलेला ट्रक काही अंतर पुढे फरफटत गेला, तर त्यापुढे उभी असलेली ओमनी कारही आयशरने फरफटत नेली. या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला असून, जखमीला येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आयशर चालकाला रस्त्यावर उभा असलेला ट्रक लक्षात न आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : ‘पश्चिमेचा कटप्पा’ कोण? सोमेश्वरच्या निवडणुकीत ‘त्या’ पोस्टरमुळे चर्चांना उधाण; नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, लक्ष्माई माता ते नागड दरवाजा रोडच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहत असल्याने रस्त्याचा बराच भाग व्यापला जातो. त्यामुळे वाहतुकीसाठी कमी जागा उरून अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाने रस्त्याच्या कडेला उभी राहणारी वाहने हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number