15 वर्षीय प्रेमप्रकरणातून घरात मोठा अनर्थ! आईचा मृत्यू अन् वडील अन् बहिणीसोबत….; घटनेने खळबळ

Crime News : 15 वर्षीय मुलीच्या प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाने घेतलं गंभीर वळण. या धक्कादायक प्रकरणातील घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

15 वर्षीय प्रेमप्रकरणातून घरात मोठा अनर्थ! आईचा मृत्यू अन् वडील अन् बहिणीसोबत….; घटनेने खळबळ
Crime News

लहान वय असं असतं जिथं प्रेमसंबंधांना अनेकदा अधिक महत्त्व दिलं जातं. अशा वेळी घरच्यांचा विरोध किंवा त्यामधून वाद होण्याच्या घटना समोर येत ही असतात. मात्र, एका प्रकरणात हा वाद अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला. अवघ्या 15 वर्षीय मुलीच्या प्रेमसंबंधातून घडलेल्या धक्कादायक घटनेत तिच्या आईला जीव गमवावा लागला असून, वडिलांनाही गंभीर परिणामांना सामोरं जावं लागलं आहे.

नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या थुथुकडी जिल्ह्यातील हा सर्व थरारक आणि धक्कादायक प्रकार आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे. जिथं आरोपी ज्ञानप्रकाश याचे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिच्या घरच्यांनी त्यांच्या या नात्याला पूर्ण विरोध केला. घरातल्याच्या सांगण्यावरुन मुलीने आरोपीसोबत असलेले सर्व संबंध तोडले होते.

हेही वाचा- धक्कादायक! लसीकरणासाठी माहेरी जाण्यावरून वाद; सासऱ्याने काठीने मारहाण करत 8 महिन्यांच्या गर्भवती सुनेला संपवलं

मुलीच्या घरच्यांकडून असलेल्या विरोधामुळे ज्ञानप्रकाश संतापला आणि शस्त्र घेत तो मुलीच्या घरात घुसला. सुरुवातीला त्याने रागाता थेट घरात असलेल्या सदस्यांवर हल्ला केला. अचानक केलेल्या हल्ल्यामध्ये मुलीची आई मेरी रेगिला यांचा जागीच मृत्यू झाला असून वडील मुथुकृष्णन गंभीर जखमी आहे, अशी माहिती आहे.

आरोपीचा क्रूरपणा इथेच थांबला नाही
आरोपी इतक्यावर थांबला नाही, या हल्ल्यानंतर त्याने घरात असलेल्या दोन्ही मुलींना जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण करत पळ काढला. पोलिसांनी माहिती मिळतात तातडीने तपास सुरु केला. पोलिसांच्या पथकाने त्या दोन मुलींची सुखरुप सुटका केली आहे. मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी ज्ञानप्रकार अजूनही फरार असून त्याचा तपास सुरु आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number