एक गोळी मानेतून आरपार गेली तर…; प्रदीप पूर्णेकरांच्या मृतदेहाचा CT स्कॅन रिपोर्ट समोर, मृत्यूमागचं नेमकं कारण उघडं

ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. ठाण्याच्या मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Pradeep Purnekar
Pradeep Purnekar

ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. ठाण्याच्या मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी 29 सप्टेंबरला रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात पाच हल्लेखोरांनी शिरुन पिस्तुलमधून सात राऊंड फायर केले. पूर्णेकर यांचे कार्यकर्ते कार्यालयात पोहोचले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

दम्यान तातडीने इन्फीनीटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्रदीप पूर्णेकर यांना मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात नेण्यात आला आहे. या हत्येमागे राजकीय संघर्ष असून शिंदे सेनेच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे दोघे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणारे सूत्रधार असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबाने केला आहे.

हेही वाचा- दुर्दैवी घटना! ठाणे गुन्हेगारांचं आश्रयस्थान…; संजय राऊतांची प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया, म्हणाले ‘खरे गुन्हेगार शिंदे गटाचे…’

दरम्यान प्रदीप पूर्णेकर यांच्या मृतदेहाचा सीटी स्कॅन रिपोर्ट समोर आला आहे. पाच हल्लेखोरांनी पिस्तुलमधून सात राऊंड फायर केले. त्यापैकी चार गोळ्या प्रदीप पूर्णेकर यांच्या शरीरात घुसल्या. यावेळी प्रदीप पूर्णेकर यांना लागलेल्या चार गोळ्यांपैकी एक गोळी मानेतून आरपार गेल्या असून दुसरी गोळी त्यांच्या छातीतच अडकून राहिली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचं सीटी स्कॅन करण्यात आलं होतं आणि या रिपोर्टमधून महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

या सगळ्या घटनेमुळे सध्या ठाण्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी नऊ पथके तयार केली आहेत. आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, पूर्णेकर कुटुंबीयांनी आरोप केलेल्या मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना पोलीस चौकशीला बोलावणार का, हे पाहावे लागेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version