छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – विजय चिडे
छत्रपती संभाजीनगरमधून अत्यंत दुःखद आणि मन हेलावून सोडणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्याच्या मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगरमध्ये दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणाला संपवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नेमके काय घडले?
मिळलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुष्कर सतीश गाडे (वय – 20 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. महेश पवार ऊर्फ भैय्या असे आरोपीचे नाव आहे. दोघांची आठ वर्षांपासून मैत्री होती. रविवारी रात्री दांडिया खेळताना झालेल्या वादानंतर दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी महेशने लोखंडी रॉडने पुष्करच्या डोक्यावर आणि मानेवर वार केले. यात पुष्करचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
या प्रकरणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. मात्र हे भांडण इतके शिगेला पोहचले की, त्याचे रूपांतर एका रक्तरंजित थरारत झाले. यावेळी न्यायालयाने आरोपीला 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मात्र अशा प्रकारची अजून एका घटनेची माहिती मुंबईतून देखील मिळाली आहे, गरब्यात जाण्याच्या वादावरून पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.