Dating App Scam: ठाण्यातील एका बारमध्ये डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेटीला आलेल्या पुरुषाला महागड्या पेय आणि फसवणुकीला समोरे जावे लागले. या पुरुषाने रेडिटवर आपली अनुभवकथा शेअर केली. यानंतर हा फसवणुकीचा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. रेडिटवरील पोस्टमध्ये त्याने सांगितले की, तो ठाण्याच्या उपवन तलावाजवळ मुलीला भेटायला गेला होता. सुमारे एक तास प्रतीक्षा केल्यानंतर मुलीने बार जवळील एका ठिकाणी भेटण्याचा सल्ला दिला. तो 'पाबलो बार अँड लाँच' नावाच्या बारमध्ये गेला, जिथे गर्दी कमी होती.
बारमध्ये मुलीने सतत महागडे अल्कोहोलिक पेय, ब्लू लेबल ऑर्डर केले. तर पुरुष स्वतः फक्त बिअर आणि वोडका घेत होता. बिल मिळाल्यावर त्याला जीएसटी आणि सेवा शुल्कासह सुमारे 26 हजार रुपये भरावे लागले. पुरुषाने शेवटी 10 हजार रुपये दिले आणि तो तेथून सुरक्षितपणे बाहेर पडला. त्याने पोस्टमध्ये सांगितले की, हे बिल तपासले नसल्यास परिस्थिती आणखी वाईट होऊ शकली असती.
हेही वाचा - Crime News : ...म्हणे, 'मी गंमत करत होतो'; 13 वर्षाच्या मुलाने ChatGPT ला विचारला असा प्रश्न, झाली थेट तुरुंगात रवानगी
नेटिझन्सची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर लोकांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले, 'हा एक प्रसिद्ध घोटाळा आहे. मुलगी आणि बारचे मालक एकत्रित असतात.' दुसऱ्या वापरकर्त्याने सल्ला दिला, 'डेटवर जाताना कॅफेमध्ये जा, महागडे पेय टाळा.' काहींनी या प्रकरणाला सामान्य घोटाळा असल्याचे अधोरेखित केले. ठाण्यातील एका रहिवाशानेही नमूद केले की, ‘पाब्लो बार अँड लाँच’ नावाचे कोणतेही रेस्टॉरंट नाही. बिलावरील GST क्रमांक देखील खोटा असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Attack on Khokya Bhosale Family: खोक्या भोसले कुटुंबावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला; 4 महिला गंभीर जखमी
दरम्यान, सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलचं व्हायरल झालं आहे. ही घटना डेटिंग अॅप्सवरील घोटाळ्यांचे धोक्याचे प्रतीक ठरली आहे. ऑनलाइन पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः अनोळखी व्यक्तींच्या भेटीदरम्यान महागड्या पेयांवर खर्च टाळण्याची सूचना अनेक नेटीझन्सनी केली आहे.