Attack on Khokya Bhosale Family: शिरूर तालुक्यातील गायरान वस्तीमध्ये शनिवारी रात्री सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या कुटुंबावर धक्कादायक आणि जीवघेणा हल्ला झाला. भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी असलेल्या खोक्या भोसले यांच्या घरात रात्री 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक घुसून हल्ला केला. या हल्ल्यात कुटुंबातील चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यातील एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
मध्यरात्री तहसील कार्यालयाजवळ हल्ला
प्राप्त माहितीनुसार, हा हल्ला शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळ झाल्याचे समोर आले आहे. टोळक्याच्या हातात दांडगे, कोयते आणि कुऱ्हाडी होत्या. त्यांनी महिलांवर अमानुष मारहाण केली. डोक्यावर, पाठीत आणि पायांवर वार केले. महिलांनी मदतीसाठी आवाज आणि किंकाळ्या फोडल्या, परंतु तरीही हल्लेखोरांनी मारहाण थांबवली नाही. प्राथमिक माहितीवरून असे दिसते की टोळक्याने महिलांवर 'अनेक वेळा सांगूनही का राहता? असे म्हणत मारहाण केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरूर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा - Chhattisgarh Shocker: प्रेयसी म्हणावं की, चेटकीण! प्रेम सिद्ध करण्यासाठी प्रियकराला प्यायला लावलं विष; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
चार महिला गंभीर जखमी
दरम्यान, जखमी महिलांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांना बीड शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, या हल्ल्यातील चार महिला गंभीर जखमी आहेत. तसेच एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
हेही वाचा - Crime News : ...म्हणे, 'मी गंमत करत होतो'; 13 वर्षाच्या मुलाने ChatGPT ला विचारला असा प्रश्न, झाली थेट तुरुंगात रवानगी
कोण आहे सतीश उर्फ खोक्या भोसले?
सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी असून, मागील पाच वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे. तो भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो. सतीश भोसलेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.