सुरेंद्र आकोडे, प्रतिनिधी
यवतमाळ : शहरातील जगत मंदिर परिसरात शनिवारी रात्री रक्तरंजित थरार घडला. यात एकाचा जागेवरच, तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील जगत मंदिर परिसरात शनिवारी रात्री दोन गटात हाणामारीची घटना घडली. या घटनेत दोघांवर जनावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. या हल्ल्यात अभय उर्फ मित्तम पाठोडे (रा. राजुरवाडी, घाटंजी, ह. मु. उमरसरा) याचा जागीच मृत्यू झाला. तर श्री जाधव हा गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती अवधुवाडी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनेसाठी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून जखमील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचायाकरिता दाखल केले. परंतु उपचारदरम्यान श्री जाधव याचाही मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली. या घटनेनंतर उमरसरा परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिस रवाना झाले आहे. या घटनेतील मृतक अभय उर्फ मित्तम पाठोडे याच्यावर विविध गुन्हे दाखल होते. विशेष म्हणजे त्याच्यावर दोनवेळा एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्यावर नेमका कोणत्या कारणावरून हल्ला झाला हे समजू शकले नाही.
हेही वाचा : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ! दादांच्या राष्ट्रवादीतील 5 मंत्री बदलणार?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.