पुण्यात खळबळ! बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू

पुण्यातील लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली.
Pune Fire
Bank of India

पुण्यातील लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शगुन चौक येथील या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अचानक आग लागली. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सुदैवाने यावेळी इमारतीत कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, सर्व्हर रूमजवळ विद्युत वाहिन्या असल्यामुळे शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन पथकाकडून पुढील पाहणी सुरू आहे.

हेही वाचा – सिल्लोडमध्ये एसटी बसला भीषण अपघात; 29 प्रवासी जखमी, 8 जणांची प्रकृती गंभीर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version