Exclusive: दोन वर्षांपूर्वीच रचला कट…गणेशोत्सवापासून प्लॅनिंग सुरू…कॉलद्वारे संपवण्याची भाषा…; प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा खळबळजनक दावा

ठाण्यातील मानपाडा परिसरात उबाठा गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

Exclusive: दोन वर्षांपूर्वीच रचला कट…गणेशोत्सवापासून प्लॅनिंग सुरू…कॉलद्वारे संपवण्याची भाषा…; प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा खळबळजनक दावा
Thane Crime

ठाण्यातील मानपाडा परिसरात उबाठा गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून या घटनेत 5 जणांची नावे आता समोर येत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी 5 राऊंड फायर केले. त्यापैकी 2 गोळ्या पूर्णेकर यांना लागल्या. त्यांना तात्काळ कापूरबावडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे आणि संतोष कनोजिया अशी आरोपींची नावे समोर आली असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मृत प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी जय महाराष्ट्र वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले राम पूर्णेकर?
दोन वर्षांपासून वडिलांच्या हत्येचा कट रचला होता. गणेशोत्सवापासून प्लॅनिंग सुरू होते. निवडणुकीवेळी व्हायरल झालेल्या कॉलमध्येही बाळा पूर्णेकरांना संपवण्याची भाषा होती. ते अन्यायाविरोधात आवाज उठवायचे म्हणून हा राग होता. या प्रकरणात उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा – ठाणे हादरलं! ठाकरे गटाचा नेता ठार; रात्री भररस्त्यात गोळ्या झाडून संपवलं

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number