कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट; पतीनेच रचला पत्नीला जीवे मारण्याचा कट, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट; पतीनेच रचला पत्नीला जीवे मारण्याचा कट, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील कन्नड शहरात घरगुती वादातून महिलेचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. रोहिणी कुंभकर्ण असे मृत व्यक्तीचे नाव असून ही हत्या त्यांच्या पतीने केल्याची माहिती समोर आली आहे.

कन्नड येथील गजानन कॉलनी परिसरात रोहिणी मुकेश कुंभकर्ण निवास करत होत्या. या प्रकरणात त्यांचे पती मुकेश कुंभकर्ण यांनीच खून केल्याची कबुली देत पोलीस ठाण्यात हजेरी लावल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा – कोल्हापूर हादरलं! लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेची पोलिसांत धाव

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपशील पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number