महिलेला मारहाण… शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चक्क मुलाचा; राहुल गांधींवर खोटं पसरवल्याचा भाजपचा आरोप, फुटेजवरून चौघांना अटक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये काही तरुण एका व्यक्तीला अत्यंत क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत.

महिलेला मारहाण… शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चक्क मुलाचा; राहुल गांधींवर खोटं पसरवल्याचा भाजपचा आरोप, फुटेजवरून चौघांना अटक
Rahul Gandhi Viral post

BJP Reply to Rahul Gandhi’s Post: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये काही तरुण एका व्यक्तीला अत्यंत क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधींनी, ‘अमित शहा यांचे दिल्ली पोलीस गुंडगिरी करत आहेत आणि आता संघ-भाजपच्या गुंडांना महिला व तरुणांना मारहाण करण्याची मोकळीक मिळाली आहे,’ असा गंभीर आरोप केला होता. मात्र, भाजपने राहुल गांधी खोटं पसरवत असल्याचं म्हटलं आहे. तसेच, ज्या व्यक्तीला महिला म्हणून मारहाण होत असल्याचा दावा केला जात आहे, ती महिला नसून प्रत्यक्षात एक तरुण (पुरुष) आहे, असं म्हटलं आहे.

‘दिशाभूल करणाऱ्या राहुल गांधींनी देशाची माफी मागावी’; भाजपची आक्रमक मागणी
राहुल गांधी जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवून देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत आणि समाजात अनावश्यक भ्रम निर्माण करत आहेत, असा घणाघाती हल्लाबोल भाजपने केला आहे. आपला राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी एका मुलाला मुलगी किंवा महिला म्हणून भासवले जात असल्याचा आरोप भाजपने केला. या खोट्या माहितीमुळे समाजात अशांतता पसरू शकते, त्यामुळे राहुल गांधींनी आपली चूक लवकरात लवकर सुधारून देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे.

हेही वाचा – ‘दिल्ली पोलीस गुंड’, त्यांनी माझ्या आई-वडिलांचं…अभिजित दीपकेंचे दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप; नेमके काय म्हणाले

दिल्ली पोलिसांची कठोर कारवाई; मारहाणीत सहभागी हिंदू रक्षा दलाचे 4 जण अटकेत
दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने याची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. व्हिडिओमध्ये काळा टी-शर्ट घातलेल्या एका मुलाला क्रूरपणे मारहाण करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे सर्व आरोपी ‘हिंदू रक्षा दल’ या संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे तपासात समोर आले आहे. हिंदू रक्षा दलाचे अध्यक्ष भूपेंद्र ऊर्फ पिंकी चौधरी यांच्या आदेशानुसारच आपण या तरुणाला मारहाण केल्याची कबुली या चौघांनी पोलिसांसमोर दिली आहे.

पोलिसांनी नोंदवला गुन्हा; प्रकरणाचा अधिक तपास सुरू
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध योग्य कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या इतर व्यक्तींचा आणि या संपूर्ण प्रकरणामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे. एका बाजूला राजकीय नेत्यांकडून या घटनेवरून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, दिल्ली पोलिसांचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच आणखी काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – CJP च्या आरोपांचे दिल्ली पोलिसांकडून खंडन; भरपत्रकार परिषदेत दाखवला दीपकेंचा पोलीस ठाण्यातील ‘तो’ व्हिडीओ

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number