‘दिल्ली पोलीस गुंड’, त्यांनी माझ्या आई-वडिलांचं…अभिजित दीपकेंचे दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप; नेमके काय म्हणाले

CJP चे मुख्य नेते अभिजित दीपके यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना दिल्ली पोलिसांवर संताप व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत.

‘दिल्ली पोलीस गुंड’, त्यांनी माझ्या आई-वडिलांचं…अभिजित दीपकेंचे दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप; नेमके काय म्हणाले

CJP चे मुख्य नेते अभिजित दीपके यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना दिल्ली पोलिसांवर संताप व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. “क्रांतिकारक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, आम्ही देशातून हुकूमशाही घालवण्यासाठी लढतोय,” असे दीपके म्हणाले.

‘प्रदूषण करण्याआधीच अटक केली’
दीपके म्हणाले, “दिल्ली पोलिसांनी माझ्याकडून देशातील शांतता भंग आणि ध्वनी प्रदूषण केल्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करवून घेण्याचा प्रयत्न केला. पण मला तर दिल्ली विमानतळावर उतरूच दिले नाही. प्रदूषण करण्याआधीच मला अटक केली, मग मी त्या कागदावर सही कशी करू? असे मी म्हटल्यावर पोलिसांनी माझ्यावर सक्ती केली. मी सांगितले, माझा वकील आल्याशिवाय कोणत्याच कागदावर सही करणार नाही. मी सुशिक्षित माणूस आहे, मला फसवता येणार नाही.”

‘पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करू’
“जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींची हुकूमशाही संपत नाही, तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत राहू,” असा इशाराही त्यांनी दिला.

‘आम्ही दिल्ली पोलिसांसारखे गुंड नाही’
अटक करण्यासाठी महिला पोलिसांना पाठवणे ही काही स्ट्रॅटेजी होती का, असा प्रश्न विचारला असता दीपके म्हणाले, “पुरुष पोलिसांनी आंदोलनातील महिलांसोबत जे गैरवर्तन (मॉलेस्टेशन) केले, त्यावरून दिल्ली पोलिसांना लाज वाटत असेल म्हणून महिला पोलिसांना पाठवले. आमच्याकडून असे काही घडले तर आमच्यावर आरोप लावता येतील म्हणून. पण आम्ही दिल्ली पोलिसांसारखे गुंड नाही.”

‘हिंमत असेल तर पूर्ण व्हिडिओ टाका’
“मी वारंवार माझ्या भावंडांशी आणि वकिलांशी बोलण्याची विनंती केली, पण त्यांनी नकार दिला. चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ एडिट करून पोस्ट केला. अटक झाल्यानंतर वकिलाला संपर्क करण्याचा मूलभूत अधिकार असतो, तोही मला दिला नाही. हिंमत असेल तर एडिट न करता पूर्ण व्हिडिओ टाका,” असे आव्हान त्यांनी दिले.

हेही वाचा – दिल्ली मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आजही 6 मेट्रो स्टेशन बंद; दुपारी 4 वाजेपर्यंत प्रवेशावर निर्बंध

‘रात्री साडेतीन वाजता जामिनाचे कागद का आणले?’
“दिल्ली पोलीस आता मोरल ड्रामा करतायत की अभिजितच्या आजीचे निधन झाले, आम्ही त्याला जायला सांगत होतो. मग रात्री साडेतीन वाजता माझ्याकडे अटकपूर्व जामिनाचे कागद का घेऊन आले? लवकरात लवकर सही कर म्हणून दबाव का टाकला? मी सांगितले, वकील आल्याशिवाय सही करणार नाही. ते मला सांगत होते, आई-बाबांना सांग तू किती वर्ष पोलिसांच्या ताब्यात राहणार आहेस. पण मी नकार दिला,” असे दीपके म्हणाले.

‘माझ्या आई-बाबांचे मानसिक संतुलन बिघडवले’
“देशाच्या कोणत्या कोपऱ्यात मला अटक केलीय, हे मला, माझ्या आई-वडिलांना आणि वकिलालाही कळवले नाही. मग मी रात्री साडेतीन वाजता आई-वडिलांना फोन करून कसे सांगू की मला किती वर्ष अटक केलीये? हा माझ्या आई-वडिलांचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न होता. त्यांच्यात जराही माणुसकी नाही. मला कुठे अटक केली हे माझ्या आई-वडिलांना का सांगितले नाही? आता कुठे गेली माणुसकी?” असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा – MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! तुकाराम मुंढेंच्या देखरेखीखाली चौकशी; शिवेंद्रराजेंनी आंदोलकांना दिला सरकारचा मसुदा

राज्यातून हद्दपार करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला. “मी सरकारमध्ये बसलोय का हद्दपार करायला? सरकारमध्ये बसलेले देवेंद्र फडणवीस इतके दिवस झोपले होते का?” असा थेट प्रश्न दीपके यांनी उपस्थित केला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number