CJP च्या आरोपांचे दिल्ली पोलिसांकडून खंडन; भरपत्रकार परिषदेत दाखवला दीपकेंचा पोलीस ठाण्यातील ‘तो’ व्हिडीओ

अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाल्याची बातमी पोलिसांना समजताच, त्यांनी तात्काळ दीपके यांना या दुःखाची कल्पना दिली. यावेळी पोलीस प्रशासनाकडून त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी विमान तिकीट, फोन कॉल सुविधा किंवा कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती.

CJP च्या आरोपांचे दिल्ली पोलिसांकडून खंडन; भरपत्रकार परिषदेत दाखवला दीपकेंचा पोलीस ठाण्यातील ‘तो’ व्हिडीओ
Abhijeet Dipke video release Delhi Police

राजधानी दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला परवानगी नाकारल्यावरून आणि पक्षाध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या अटकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्ली पोलिसांच्या वतीने वरिष्ठ अधिकारी डीसीपी नेहा यादव यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाल्याची बातमी पोलिसांना समजताच, त्यांनी तात्काळ दीपके यांना या दुःखाची कल्पना दिली. यावेळी पोलीस प्रशासनाकडून त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी विमान तिकीट, फोन कॉल सुविधा किंवा कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, दीपके यांनी स्वतःहून या सर्व मदतीस आणि पालकांशी संवाद साधण्यास स्पष्ट नकार दिल्याचा दावा पोलिसांनी व्हिडिओ पुरावा जारी करत केला आहे.

हेही वाचा – ‘भित्रे लोक आम्हाला घाबरवू शकत नाहीत…’; राहुल गांधींकडून उद्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत भव्य देशव्यापी मोर्चाची घोषणा

मागील हिंसक इतिहासामुळेच जनपथवरील आंदोलनाला परवानगी नाकारल्याचा खुलासा

CJP च्या प्रस्तावित धरणे आंदोलनाला ऐनवेळी परवानगी का नाकारण्यात आली, यावर माहिती देताना डीसीपी नेहा यादव यांनी पक्षाच्या जुन्या पार्श्वभूमीचा दाखला दिला. पोलिसांच्या अधिकृत नोंदीनुसार, CJP कडून यापूर्वीच्या आंदोलनांदरम्यान प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वे आणि कायदेशीर प्रक्रियेचे सातत्याने उल्लंघन झाले आहे. पूर्वी जेव्हा जेव्हा पक्षाला आंदोलनाची मुभा देण्यात आली होती, तेव्हा तिथे जमलेल्या जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक, सार्वजनिक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसक कृत्ये करण्यात आली होती. या प्रकारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक आणि सरकारी मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले होते, असे पोलीस प्रशासनाने नमूद केले.

राजधानीत सुरक्षा कारणास्तव BNSS चे कलम 133 लागू

कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती, वाहतुकीचा खोळंबा आणि सुरक्षेचा गंभीर धोका लक्षात घेता जनपथ परिसरातील प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारणे भाग पडले, असे स्पष्टीकरण डीसीपी यांनी दिले. सुरक्षेचा उपाय म्हणून शहरातील विविध महत्त्वाच्या भागांत ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ (BNSS) चे कलम 133 लागू करण्यात आले होते, ज्यानुसार 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास व निदर्शने करण्यास मनाई होती. या बंदीहुकूमाचा भंग केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर जमाव जमवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल 10 ऑक्टोबर रोजी अभिजीत दीपके आणि त्यांच्यासोबत असलेल्या 2 सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number