पिंपरी चिंचवडमध्ये आगीचे रौद्ररूप! 3 लक्झरी बसेस जळून खाक, प्रवासी…

पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
Pimpri Chinchwad Fire
Luxury Bus Fire

पुणे: पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. काल रात्री अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ उभ्या असलेल्या तीन लक्झरी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत तिन्ही लक्झरी बस जळून खाक झाल्या. त्यातील आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने एकच खळबळ उडाली.

आगीची माहिती मिळताच भोसरी, चिखली आणि पिंपरी अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र तीनही बस जळून खाक झाल्याने मोठं आर्थिक नुकसान झाल आहे.

हेही वाचा – पतीपासून वेगळी झाली अन् मटण शॉप वाल्यासोबत जुळलं; अखेर मृतदेहाचे तुकडे करत केलं हादरवणार कृत्य

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version