अडीच लाखांच्या व्यवहारातून विवाह, लग्नानंतर तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; वेल्हाण्यातील विवाह प्रकरणाला धक्कादायक वळण

मुलाचे लग्न जमवण्यासाठी अडीच लाखांची बोली लावून परराज्यातून आणलेली नवरी अवघ्या तिसऱ्याच दिवशी सासरच्या कुटुंबाच्या जीवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे उघडकीस आला आहे.

अडीच लाखांच्या व्यवहारातून विवाह, लग्नानंतर तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; वेल्हाण्यातील विवाह प्रकरणाला धक्कादायक वळण
Jalgaon Crime

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाचे लग्न जमवण्यासाठी अडीच लाखांची बोली लावून परराज्यातून आणलेली नवरी अवघ्या तिसऱ्याच दिवशी सासरच्या कुटुंबाच्या जीवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे उघडकीस आला आहे.

हेही वाचा- पोलिसांनी पाय बांधले, उलटं टांगलं, मारहाण केली…; आदिवासी महिलेच्या गंभीर आरोपांची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, चौकशीचे दिले आदेश

जेवणात उंदीर मारण्याचे विषारी औषध कालवून पतीच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचणाऱ्या आणि ऐवजासह पोबारा करणाऱ्या दोन तरुणींना पारोळा पोलिसांनी अवघ्या काही तासांत धुळे सीमेवरून बेड्या ठोकल्या आहेत. जळगावच्या पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे लग्नानंतर जेवणातून विषारी औषध देऊन कुटुंबातील तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी सुमन सुभाष सहाणी आणि आरती सूर्यप्रकाश पटेल या दोघींना पोलिसांनी धुळे जिल्ह्यातून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिक ताराचंद पाटील यांचा सुमन सहाणी हिच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी फिर्यादी गणेश पाटील, त्यांचे वडील ताराचंद आणि आई सरलाबाई यांना जेवणातून उंदीर मारण्याचे औषध दिल्याचा आरोप आहे. यानंतर दोन्ही महिला पैसे घेऊन पसार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.वेल्हाणेच्या पोलीस पाटलांकडून माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तपास सुरू केला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number