Crime News : निळ्या ड्रमपेक्षाही भयानक कांड, पतीवर चाकूने अनेक वार, 13 इंच पोट फाडलं, आतडे बॅगेत भरताना घरमालकाने पाहिलं अन्…

भांडणाचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून घरमालक तातडीने वरच्या मजल्यावरील खोलीकडे धावला. खोलीतले दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

Crime News : निळ्या ड्रमपेक्षाही भयानक कांड, पतीवर चाकूने अनेक वार, 13 इंच पोट फाडलं, आतडे बॅगेत भरताना घरमालकाने पाहिलं अन्…

Haryana Vimla Devi Stabs Husband Rajesh: हरियाणातील कुरुक्षेत्र येथील पिहोवा रोडवर राज पॅलेसजवळ एका भाड्याच्या खोलीत विमला देवी नावाच्या महिलेने पती राजेश (वय 40) याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूळचे उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील धामपूर गावचे रहिवासी असलेले हे दांपत्य गेल्या एका वर्षापासून या ठिकाणी राहत होते. रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या खोलीतून जोरात भांडणाचा आवाज आला, ज्यानंतर हे भीषण हत्याकांड घडले.

पोटात 35 सेंटीमीटर खोल वार; बाहेर आलेल्या आतड्या पिशवीत भरताना पकडले
भांडणाचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून घरमालक रिंकू तातडीने वरच्या मजल्यावरील खोलीकडे धावला. खोलीचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली; राजेश जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला होता आणि संपूर्ण खोलीभर रक्ताचे डाग पसरले होते. आरोपी पत्नी विमला देवी ही राजेशचे 35 सेंटीमीटरपर्यंत कापलेल्या पोटातून बाहेर आलेल्या आतड्या एका प्लास्टिक पिशवीत भरत होती.

हेही वाचा – Crime News : एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या! मगं त्याच घरात आंघोळ अन् जेवण; सैतानालाही लाजवेल असं हत्याकांड

घरमालकाला पाहून छतावरून खाली उडी; आरोपी महिला गंभीर जखमी
घरमालक समोर आल्याचे पाहताच विमला देवी प्रचंड घाबरली आणि तिने पकडले जाण्याच्या भीतीपोटी थेट छतावरून खाली उडी मारली. या अपघातात तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विमला देवीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, तेथे तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

पोस्टमॉर्टम अहवालात धक्कादायक खुलासा; लिव्हर आणि डावी किडनी गायब
या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर तपासाला अत्यंत वेगळे आणि भयानक वळण मिळाले आहे. डॉक्टरांच्या पथकाला राजेशच्या शरीरातील लिव्हरचा मोठा भाग आणि डावी किडनी गायब असल्याचे आढळले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून वेगवेगळ्या आकारांचे 3 चाकू जप्त केले आहेत. ही हत्या केवळ कौटुंबिक वादातून झाली की यामागे कोणताही अंधश्रद्धा किंवा अवयव तस्करीचा प्रकार आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा – Crime News: क्रूरतेचा कळस! घरगुती वादातून पती अन् सासूने बळजबरीने पाजलं टॉयलेट क्लिनर; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number