हिमाचलमध्ये भयंकर कांड करून मुंबईच्या दिशेने निघाले; वाटेत भूक लागताच एक चूक केली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले

Crime News : एका गंभीर हत्याकांडाचा धागा थेट जळगावपर्यंत पोहोचला. हिमाचल प्रदेशात हत्या करुन मुंबईच्या दिशेने येत असलेल्या चार आरोपींना जळगावच्या शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Himachal Murder Case Four Absconding Accused Arrested in Jalgaon
भुकेच्या नादात आरोपी जळगावात अडकले जाळ्यात

जळगाव : जळगाव रेल्वे स्थानक परिसरात नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दश सुरु होती. मात्र, याच प्रवाशांच्या गर्दीमध्ये चार संशयित व्यक्ती हे पोलिसांच्या रडारवर आले आणि काही वेळामध्ये एका गंभीर हत्याकांडाचा धागा थेट जळगावपर्यंत पोहोचला. हिमाचल प्रदेशात हत्या करुन मुंबईच्या दिशेने येत असलेल्या चार आरोपींना जळगावच्या शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

घडलं काय?
जळगाव स्थानकावर करण्यात आलेल्या कारवाईमागे हिमाचल प्रदेश पोलिसांकडून मिळालेली गोपनीय माहिती अत्यंत महत्त्वाची ठरली. हिमाचल प्रदेशातील किसंपूर या परिसरात मुकेश कुमाय या नावाच्या व्यक्तीची हत्या केल्यानंतर चारही संशयित फरार झाले होते. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा-2 वर्षांच्या मुलीसमोर पतीचा आक्रोश, पत्नीच्या शोधासाठी धावपळ; अखेर तपासात पतीबाबतच समोर आलं धक्कादायक गूढ!

का करण्यात आली हत्या?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुकेश कुमार तसेच आरोपी हे एकत्र बसून मद्यपान करत होते. त्याच वेळी मुकेश कुमार याने आरोपींच्या बहिणीवरुन शिवीगाळ केल्याचं समोर येत आहे. याचवरुन वाद वाढत गेला आणि संतापलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यानंतर या चौघांनीही घाबरुन घटनास्थळावरुन पळ काढला.

जळगावात भुकेने केली एक चूक
आरोपी बुधवारी सकाळी किसंपूरमधून निघाले आणि अंबाला येथे पोहोचले. पुढे तेथून दुपारी साधाणर साडेचारच्या दरम्यान मुंबई एक्सप्रेसने त्यांनी पुढचा प्रवास सुरु केला.मात्र, याच प्रवासात त्यांचे पैसे संपले आणि अडचणी येऊ लागल्या. प्रवासादरम्यान भूक लागल्याने आणि पुढच्या प्रवासासाठी पैसे पूर्णपणे संपल्याने त्यांनी चोरी केलेला मोबाईल विकण्याचा निर्णय घेतला, यासाठी आरोपी जळगावमध्ये उतरले.

दरम्यान, हिमाचल पोलिसांना हत्येची घटना कळताच त्यांनी आरोपींचा तपास सुरु केला होता. त्यात ते मोबाईल लोकेशनचा माग काढत होते. त्यानंतर आरोपीचं लोकेशन जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे कळताच त्यांनी तातडीने ही माहिती पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना दिली.

हेही वाचा-पत्नीची नवी साडी अन् ऑफिसमधील बंद खोली…; व्यावसायिकाने गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल

त्यानंतर गुन्हे शोध पथकाने संबंधित परिसरात अत्यंत गुप्तपणे आरोपींचा शोध सुरु केला. मोबाईल विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या या चौघआंना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं. चंदन कुमार, रोशन गोगल मुखिया, संतोष कुमार, अजित कुमार जोगा मेहतो, अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या हिमाचल प्रदेश पोलिसांचे पथक त्यांचा ताबा घेण्यासाठी जळगावकडे रवाना झाले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना हिमाचल प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version