Friday, November 14, 2025 07:52:08 PM

Solapur Crime : घरगुती वाद टोकाला, शेतात पत्नीची हत्या; पतीने फरशी डोक्यात घातली

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंदनगर परिसरात एक खळबळजनक घटना घडली. घरगुती वादातून पती नीलकंठ भीमराव पाटील याने पत्नी गौराबाई नीलकंठ पाटील यांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची निर्घृण हत्या केली.

solapur crime  घरगुती वाद टोकाला शेतात पत्नीची हत्या पतीने फरशी डोक्यात घातली

रवी ढोबाळे. प्रतिनिधी. सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंदनगर परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. घरगुती वादातून पती नीलकंठ भीमराव पाटील याने पत्नी गौराबाई नीलकंठ पाटील यांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे, संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा: Pune Terrible Accident : खंडाळाजवळ विचित्र अपघात, 18-20 वाहने एकमेकांवर आदळली; अपघात नेमका कसा झाला?

नेमकं प्रकरण काय?

ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली होती. मागील काही काळापासून बंगळुरू येथे राहणाऱ्या आपल्या मुलाकडे गौराबाई यांचं येणं-जाणं सुरू होतं. त्यामुळे, पती-पत्नी यांच्यात वारंवार भांडण होते. 'शेतात न येणारी तू आज कशी आली', असा सवाल पती नीलकंठ पाटील यांनी त्यांच्या पत्नी गौराबाईंना विचारले. या कारणातून पती नीलकंठ पाटील आक्रमक झाले आणि रागाच्या भरात पती नीलकंठने चक्क फरशी उचलून पत्नीच्या डोक्यात घातली. डोक्यावर फरशी पडल्याने गौराबाई गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा: Eknath Khadse : एकनाथ खडसे यांचं महाजनांना ओपन चॅलेंज, चव्हाणांच्या आरोपांना थेट उत्तर

गौराबाई आणि नीलकंठ या पती-पत्नीला दोन मुले आसून, त्यापैकी एक मुलगा बेंगळुरूमध्ये खाजगी नोकरीत काम करतो आणि दुसरा मुलगा गावातच राहतो. मागील काही दिवसांपूर्वी गौराबाई त्यांच्या मुलाकडे राहत होत्या. या कारणामुळे घरात दुलर्क्ष होत असल्यामुळे यांच्यात सतत भांडण होत होते. या घटनेची माहिती मिळताच विजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी पाठवले. यासह, पोलिसांनी आरोपी नीलकंठ पाटील याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री