घरात पत्नीच्या मृत्यूचं दुःख; पतीने आजीशीच थाटला संसार, पुढे जे घडलं ते हादरवणारं

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक हत्येने नातेसंबंध, कौटुंबिक संघर्षासह वैयक्तिक आयुष्याभोवती अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. कार वॉशिंग सेंटरमध्ये बसलेल्या नवजोत सिंह या तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी येत गोळीबार केला आणि या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. शनिवार 10 ऑक्टोबरच्या संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा […]

घरात पत्नीच्या मृत्यूचं दुःख; पतीने आजीशीच थाटला संसार, पुढे जे घडलं ते हादरवणारं
Husband Marries His Grandmother After His Wife’s Death

उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक हत्येने नातेसंबंध, कौटुंबिक संघर्षासह वैयक्तिक आयुष्याभोवती अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. कार वॉशिंग सेंटरमध्ये बसलेल्या नवजोत सिंह या तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी येत गोळीबार केला आणि या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. शनिवार 10 ऑक्टोबरच्या संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आहे.

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचा धक्कादायक निर्णय
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नवजोतच्या आयुष्यातील गेल्या काही वर्षांत घडलेल्या काही घटना. साधारण तीन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा माहेरी मृत्यू झाला होता. या प्रकरणी नवजोतवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झालेला आणि त्यासाठी त्याला तुरुंगातही जावे लागले होते. जवळपास 2 वर्षांपूर्वी तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्या वैयक्तित आयुष्यात आणखी एक मोठी घटना घडली.

हेही वाचा-मुंबई महामार्गावर अपघातांची मालिका! सलग दुसऱ्या दुर्घटनेने खळबळ, दोन्ही चालक गंभीर

मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगातून सुटून आल्यानंतर नवजोतचे त्याच्या नात्यामधील असलेल्या एका विधवा आजीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे दोघांनीही लग्न केले. या नात्यामुळे कुटुंबीयासह नातेवाईकांमध्ये प्रचंड नाराजी वाढली होती.संबंधित महिलेचे मुलं मोठी असून ती परदेशात नोकरी करतात. लग्न केल्यानंतर ती नवजोतसोबत राहत असल्याने दोन्ही बाजूंमध्ये मतभेद कायम होते.

नवजोतच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, याआधी त्या महिलेला तिच्या माहेरच्या माणसांकडे पाठवण्यात आलेले होते. मात्र, ती पुन्हा नवजोतकडे परतली होती. या हत्येमागे कौटुंबिक वाद कारणीभूत आहे का याचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे. पण अजून खात्री होऊ शकली नाही. दरम्यान पोलिसांनाकडून या घटनेचा सखोल तपास सुरु आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number