एकच चणिया चोली आहे? थांबा! 3 वेगळ्या स्टाइलमध्ये कशी घालाल ते जाणून घ्या, नवरात्री स्पेशल आउटफिट हॅक

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवसाचा रंग नारंगी आहे.

एकच चणिया चोली आहे? थांबा! 3 वेगळ्या स्टाइलमध्ये कशी घालाल ते जाणून घ्या, नवरात्री स्पेशल आउटफिट हॅक

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवसाचा रंग नारंगी आहे. गरब्याच्या दिवशी त्या-त्या रंगाचा पेहराव करून गरबा खेळण्याची मज्जाच वेगळी. मात्र सध्या चणिया चोलीचे भाव गगनाला भिडले आहेत. प्रत्येक दिवसासाठी वेगळा सेट घेणं खिशाला परवडणारं नाही.मग उपाय काय? एकाच चणिया चोलीला 3 वेगळ्या स्टाइलमध्ये ट्राय करा. हटके लूकसोबतच पैशांचीही बचत होईल आणि कमी खर्चात सेलिब्रिटी लूक मिळेल.

लूक 1 : ट्रेडिशनल गरबा क्वीन – पहिल्या दिवसासाठी
काय कराल? – तुमच्या चणिया चोलीवर जड ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घाला. मोठे झुमके, नथ आणि कंबरपट्टा.
हेअरस्टाइल – केसांना मेस्सी बन आणि त्याला गजरा.
टीप – यावेळी दुपट्टा समोरून ओपन ड्रेप करा, लूक एकदम भरलेला दिसेल.

लूक 2 : इंडो-वेस्टर्न फ्युजन – मित्र-मैत्रिणींसोबतच्या गरब्यासाठी
काय कराल? – चोलीच्या वरती एक लॉंग श्रग किंवा डेनिम जॅकेट घाला. चणियाचा घेर थोडा वर करून त्याला बेल्ट लावा.
ज्वेलरी – फक्त एक मोठी रिंग आणि लहान कानातले.
हा लूक गरबा खेळताना खूप कम्फर्टेबल असतो आणि फोटोमध्येही एकदम हटके दिसतो.

हेही वाचा – नवरात्रीत उपवास करताना ॲसिडिटीचा त्रास होतोय? ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा आराम

लूक 3 : मिनिमल अँड एलिगंट – अष्टमी / दांडियासाठी
काय कराल? – तोच चणिया आणि वेगळ्या रंगाची प्लेन ब्लॅक किंवा व्हाइट चोली मिक्स-मॅच करा. दुपट्टा स्कर्टमध्ये खोसून साइडला लटकवा.
ज्वेलरी – चोकर आणि हातात भरपूर बांगड्या.
टीप – डोळ्यांना बोल्ड काजळ आणि न्यूड लिपस्टिक, लूक एकदम क्लासी होईल.

एक्स्ट्रा हॅक:
1. चोली उलट घालून बॅकलेस लूक ट्राय करा.
2. दुपट्ट्याचा टॉप म्हणून वापर करा.
3. चणियावर फक्त व्हाइट कुर्ती आणि ऑक्सिडाइज्ड हार घातला तरी नवा ड्रेस वाटेल.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number