धक्कादायक! कौटुंबिक वादाचा दुखःद शेवट, महिलेसह तीन वर्षांच्या चिमुकल्याला दगडाने ठेचून मारले; संशयित पती ताब्यात

​धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अष्टाणे गावात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या 28 वर्षीय पत्नीची आणि तीन वर्षांच्या निष्पाप मुलाला दगडाने ठेचून मारले.
dhule district crime news
dhule district crime news

धुळे : ​धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अष्टाणे गावात एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्या 28 वर्षीय पत्नी आणि तीन वर्षांच्या निष्पाप मुलाला दगडाने ठेचून मारले. ​नागेश ठाकरे असे संशयित पतीचे नाव असून, त्याने पत्नी बाईचीबाई ठाकरे आणि मुलगा रोहित यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात माय-लेकरांचा जागीच मृत्यू झाला. या दुहेरी हत्याकांडांनंतर संशयित नागेशने स्वतःलाही जखमी करून घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पतीला उपचारासाठी धुळे येथे दाखल केले आहे. याप्रकरणी साक्री पोलीस अधिक तपास करत असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : प्रियकरासाठी पत्नीने रचला धक्कादायक कट; YouTube वर पाहिलं अन् पुढे जे घडलं…

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version