प्रियकरासाठी पत्नीने रचला धक्कादायक कट; YouTube वर पाहिलं अन् पुढे जे घडलं…

Crime News : कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपासात महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

प्रियकरासाठी पत्नीने रचला धक्कादायक कट; YouTube वर पाहिलं अन् पुढे जे घडलं…
Crime News

कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील हुनसूरमधून एक थरारक घटना समोर आलेली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीलाच पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे. पवित्र असे आरोपी महिलेचे नाव असून तिचा प्रियकर सुनील यालाही पोलिसांनी सध्या अटक केलेली आहे.

अनैतिक संबंधातून पतीचा अडसर
मिळालेल्या माहितीनुसार, पवित्राचे लग्न रामप्रसाद सोबत झाले होते, त्यांना दोन मुलेही आहे. सुखी संसार सुरु असतानाच गावातील सुनीलसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. याच कारणावरुन रामप्रसाद आणि पवित्रामध्ये दररोज वाद होत असत. पण दररोजच्या वादाला कंटाळून पवित्राने पतीला संपवण्याता कट रचला. त्यासाठी पवित्राने युट्युबवरुन धोतऱ्याच्या विषारी बिया कशा वापरायच्या याची संपूर्ण माहिती मिळवून घेतली.

हेही वाचा – ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; व्हिडीओ कॉलवर प्रियकराला धमकी देत MNC कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने गळफास लावून संपवली जीवनयात्रा

प्रियकराला घरी बोलावलं
16 ऑक्टोबरच्या रात्री रामप्रसाद दारु पिऊन घरी गेला. त्यावेळी पवित्राने ठरल्याप्रमाणे इडलीत धोतऱ्याच्या बियांची पावडर मिसळली आणि नवऱ्याला खायला दिली. मात्र, तिच्या मनाप्रमाणे विषाचा परिणाम झालाच नाही आणि रामप्रसाद ते खाऊनही जिवंत राहिला. घाबरलेल्या पवित्राने तातडीने प्रियकर सुनीलला घरी बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनी मिळून रामप्रसादचा गळा आवळून त्याची जागीच हत्या केली.

काही दिवसांत तपासात समोर आलं सत्य
धक्कादायक म्हणजे, हत्येनंतर सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी तिने नाटक केले. पवित्राने रामप्रसादच्या भावाला फोन करुन ”दही खाल्लापासून ते उठतच नाही” असे खोटे सांगितले. कुटुंबीयांनी घाबरुन त्याला रुग्णालयता दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. सुरुवातील सर्वांनी तिच्यावर विश्वास ठेवला आणि अंत्यसंस्कारही उरकले. अखेर पोलिस तपासात हत्येचं सर्व गूढ उकलंल आणि पवित्रासह तिच्या प्रियकराला अटकही करण्यात आली.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number