Belapur ST Bus Accident : बेलापूरमध्ये एस टी बसचा भीषण अपघात! तीन रिक्षा आणि तीन कारला जोरदार धडक; 8 ते 9 जखमी

नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील बेलापूरमध्ये एस टी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एस टी बससह तीन रिक्षा आणि तीन कारचे मोठे नुकसान झालं आहे.
Belapur ST Bus Accident
Belapur ST Bus Accident

नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील बेलापूरमध्ये एस टी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एस टी बससह तीन रिक्षा आणि तीन कारचे मोठे नुकसान झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईहून मुरूडच्या दिशेने जाणाऱ्या बसचे बेलापूरमध्ये ब्रेक फेल झाल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने तब्बल तीन रिक्षा आणि तीन कारला जोरदार धडक दिली.

हेही वाचा- Accident News: एका क्षणात होत्याचं नव्हतं! अंत्यविधीला जाणाऱ्या बोलेरोला ट्रकची जोरदार धडक; 5 जणांचा मृत्यू

या अपघातात 8 ते 9 जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, अपघातामुळे रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली.

या अपघातामुळे बेलापूर परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक कार्यवाही केली जात आहे. पोलिसांकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version