Raigad Crime News : धक्कादायक! मुलाचा जन्मदात्या आईवर सुरीने वार; नंतर स्वतःवरही वार करून केला जीवन संपवण्याचा प्रयत्न, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

रायगड : रायगडमध्ये महाड तालुक्यातील रुपवली सुंभेकोंड येथे पोटच्या मुलानेच आपल्या आईवर भाजी कापण्याच्या सुरीने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र मोतीराम सुंभे असे (वय 24 ) आरोपीचे नाव असून विमल मोतीराम सुंभे असे जखमी आईचे नाव आहे. याप्रकरणी महाड MIDC  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी राजेंद्र सुंभे याला अटक केली […]

Raigad Crime News : धक्कादायक! मुलाचा जन्मदात्या आईवर सुरीने वार; नंतर स्वतःवरही वार करून केला जीवन संपवण्याचा प्रयत्न, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

रायगड : रायगडमध्ये महाड तालुक्यातील रुपवली सुंभेकोंड येथे पोटच्या मुलानेच आपल्या आईवर भाजी कापण्याच्या सुरीने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र मोतीराम सुंभे असे (वय 24 ) आरोपीचे नाव असून विमल मोतीराम सुंभे असे जखमी आईचे नाव आहे. याप्रकरणी महाड MIDC  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी राजेंद्र सुंभे याला अटक केली आहे. विमल सुंभे हे गंभीर जखमी झाल्या असल्याने त्यांना उपचारासाठी पनवेलला हलवण्यात आले. मात्र हा हल्ला का करण्यात आला याचे कारण अस्पष्ट आहे.

हेही वाचा : Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द, नगरविकास विभागाकडून अधिसूचना जारी; सहा वर्षे निवडणूक लढविण्यासही बंदी

मुलानेच आईशी किरकोळ वादातून तिच्यावर भाजी कापण्याच्या सुरीने हल्ला केल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजते. किरकोळ वादाचे पर्यावसन रक्तरंजित घटनेत घडल्यानंतर घाबरलेल्या या मुलानेनंतर स्वत:वरही वार करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number