Online Friendship and Love : पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवरील (Instagram) ओळखीनंतर वाढलेल्या चॅटिंगमुळे जुळलेल्या प्रेमातून (Love Trap) दोन अल्पवयीन मुलींनी थेट साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करत राजस्थानात (Rajasthan Crime) पाय ठेवला. या दोन्ही मुलींना पोलिसांनी सुरक्षितपणे माघारी आणले असून, त्यांना फूस लावणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. काळेपडळ येथील या घटनेमुळे समाजमाध्यमातील (Social Media) ओळखी आणि अजाणतेपणी जुळलेली नाती अल्पवयीन मुलींना (Minor Girls) धोकादायक वळणावर नेत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
चार दिवसांची शोधमोहीम आणि अटक
या दोन्ही मुलींचा मागोवा घेण्यासाठी काळेपडळ पोलिसांनी (Kale Padal Police) तब्बल साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करत चार दिवसांची शोधमोहीम राबवली. अखेर पोलिसांना दोन्ही मुलींची सुरक्षित सुटका करण्यात यश आले. या प्रकरणी राजस्थानमधील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी अटक केलेल्यांची नावे सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (वय 21, रा. राणी, राजस्थान) आणि सुरेशकुमार मोहनलाल राणाभील (वय 20) अशी आहेत. त्यांच्यावर काळेपडळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा (Kidnapping Case) दाखल करण्यात आला होता.
ऑनलाईन ओळख आणि धोका
या दोन्ही मुली 15 आणि 16 वर्षांच्या असून त्या एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी आहेत. यापैकी 15 वर्षीय मुलीचे इन्स्टाग्राम वर खाते होते. यातूनच तिची ओळख राजस्थानच्या सुरेशकुमार प्रजापतीशी झाली. सुरेशकुमारने तिला थेट राजस्थानात येण्यास सांगितले. मुलगी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून 16 वर्षीय मैत्रिणीलाही घेऊन राजस्थानाकडे निघाली. त्या ठिकाणी पोहोचल्यावर प्रजापतीने दुसऱ्या मुलीची ओळख त्याचा मित्र सुरेशकुमार राणाभील याच्याशी करून दिली.
हेही वाचा - Mumbai Girl Missing Case : भयंकर! मायानगरी मुंबईत बेपत्ता मुलींचे 1,187 गुन्हे दाखल; 10 महिन्यांचा धक्कादायक आकडा समोर
कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर तपास सुरु
दोन्ही मुली अचानक गायब (Pune Missing Girls Complaint) झाल्याने कुटुंबीयांनी काळेपडळ पोलिसांकडे तक्रार दिली. अल्पवयीन मुली असल्याने पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणात एक मुलगी राजस्थानमधील राणी गावात, तर दुसरी पाली जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.
वरिष्ठ निरीक्षकांनी दिली माहिती
या कारवाईबाबत काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "अल्पवयीन मुली घरातून नाहीशा ल्याची तक्रार गांभीर्याने घेऊन तातडीने तपास सुरू केला. त्या वेळी मुली राजस्थानात गेल्याचे स्पष्ट झाले. राजस्थानात जाऊन चार दिवसांत मुलींचा शोध लावला, मुलींना सुखरूप आणले आणि आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपींकडे सखोल चौकशी केली जात आहे." ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजय हंचाटे आणि त्यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - Mumbai Crime: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलाने 'ती' गोळी खाल्ली अन् 5 वर्षांच्या चिमुरडीसोबत नको ते कृत्य केलं