Crime : बापच बनला वैरी! क्षुल्लक कारणावरून 17 वर्षांच्या मुलीला विहिरीत ढकलून दिलं अन् बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली

17 वर्षांची मेघना अचानक घरातून गायब झाली. यानंतर तिच्या आईने पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार नोंदवली.

Crime : बापच बनला वैरी! क्षुल्लक कारणावरून 17 वर्षांच्या मुलीला विहिरीत ढकलून दिलं अन् बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली

Crime News : पोटच्या मुलीचे लग्न पत्नीच्या नातेवाईकांमध्ये करून देण्यास वडिलांचा तीव्र विरोध होता. या किरकोळ घरगुती वादाचे रूपांतर अखेर एका जीवघेण्या आणि अमानुष हत्याकांडात झाले. गेल्या एका महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच जन्मदात्या बापाने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यातून हा अत्यंत अंगावर काटा आणणारा आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. मेघना असे या दुर्दैवी मृत मुलीचे नाव असून, ती शिरा तालुक्यातील निंबेमरदहळ्ळी गावात आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. 

संशयाची सुई आणि पोलिसांचा तपास
हे संपूर्ण प्रकरण 16 एप्रिल रोजी उघडकीस आले, कारण मेघना अचानक घरातून गायब झाली. तिची आई निर्मला ही संध्याकाळी 6.30 वाजता मजुरी करून घरी परतली, तेव्हा तिला मेघना कुठेच दिसली नाही. निर्मलाने लगेच तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन बंद येत असल्याने त्यांना काळजी वाटू लागली. यानंतर तिने पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार नोंदवली. प्राथमिक तपासादरम्यान मेघना बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांतच तिचे वडील थिम्मरायाप्पा हे देखील अचानक गावातून गायब झाला. त्यामुळे पोलिसांचा संशय थेट वडिलांवर गेला आणि त्यांनी शोधमोहीम तीव्र केली.

हेही वाचा – Nagpur Crime: संघ मुख्यालयाजवळ मध्यरात्री गोळीबार; नागपूरच्या मध्यवर्ती भागात दहशतीचं वातावरण

4-5 महिन्यांपासून घरात सुरू होता कलह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघनाच्या लग्नाच्या नियोजनावरून गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून या कुटुंबात सातत्याने उग्र वाद होत होते. आई निर्मला आणि तिचे माहेरचे नातेवाईक मेघना 18 वर्षांची झाल्यावर तिचे लग्न एका जवळच्या नातेवाईकाच्या मुलाशी लावून देण्याच्या तयारीत होते. अगदी मुलाकडच्या लोकांनी लग्नाची खरेदी करत साड्या आणि मंगळसूत्रही आणले होते. मात्र, थिम्मरायाप्पाचा या स्थळाला कडाडून विरोध होता. यावरून घरात रोज भांडणे होत असत. अशाच एका मोठ्या भांडणाच्या दुसऱ्याच दिवशी या क्रूर बापाने मेघना घरात एकटी असताना तिला संपवण्याचा भयानक कट रचला.

विहिरीत ढकलून हत्या आणि भयंकर गुन्ह्याची कबुली
सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी थिम्मरायाप्पा स्वतः पत्नीसोबत पोलीस ठाण्यात गेला होता आणि तिची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यास त्याने मदत केली होती. जेणेकरून स्वतःवर संशय येऊ नये. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तो पुरता कोलमडला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. थिम्मरायाप्पाने प्रथम मेघनाला एका विहिरीत ढकलले आणि ती बुडत असताना तिच्यावर वरून मोठे दगड फेकले. ती मेल्याची खात्री पटल्यावर तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून एका निर्जन ठिकाणी नेऊन जमिनीत गाडून टाकला. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

हेही वाचा – Bhiwandi Crime: सख्खा भाऊ पक्का वैरी! भावानेच दिली भावाची सुपारी; कामावर जात असताना…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number