81 साक्षीदार अन् 12 वर्षांचा लढा! भाजप आणि RSS च्या 21 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता; काय आहे नेमकं प्रकरण?

न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 21 भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्यांना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे.
81 साक्षीदार अन् 12 वर्षांचा लढा! भाजप आणि RSS च्या 21 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता; काय आहे नेमकं प्रकरण?
Zainul Abid death case

केरळमधील कासरगोड येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने वर्ष 2014 मधील सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) चे कार्यकर्ते जैनुल आबिद यांच्या मृत्यू प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 21 भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्यांना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे. न्यायाधीश अचिंत्य राज उन्नी यांनी हा निर्णय देताना स्पष्ट केले की, सरकारी पक्ष आणि फिर्यादी आरोपींवरील गंभीर आरोप न्यायालयात सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. सुटका झालेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये भाजपचे स्थानिक नेते महेश के. उदयन, प्रशांत, प्रताप आणि हरीश बी. यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

150 दस्तऐवजांची कसून तपासणी

या हायप्रोफाइल खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी एकूण 81 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. याशिवाय घटनेशी संबंधित 20 महत्त्वाचे पुरावे आणि तब्बल 150 हून अधिक कायदेशीर दस्तऐवजांची अत्यंत बारकाईने तपासणी करण्यात आली. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर आणि सादर केलेले पुरावे अपुरे व अस्पष्ट असल्याचे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची सुटका करण्याचा आदेश दिला. तब्बल 12 वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर हा निकाल समोर आला आहे.

हेही वाचा – अनर्थ टळला! होमगार्ड्सची सतर्कता; रेल्वे रुळावरून वेळीच महिलेला चिमुकल्यासह केलं बाजूला

2014 मधील दुर्दैवी हत्येची पार्श्वभूमी आणि कायदेशीर घडामोडी

ही घटना 22 डिसेंबर 2014 रोजी रात्री सुमारे 9:30 च्या सुमारास कासरगोड येथील जुन्या बसस्थानकाजवळ घडली होती. तलंगारे कुन्निल येथील रहिवासी असलेला 24 वर्षीय तरुण जैनुल आबिद आपल्या वडिलांच्या दुकानात त्यांना मदत करत होता. त्यावेळी काही अज्ञात हल्खोरांनी दुकानात घुसून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत आबिदला उपचारासाठी आधी स्थानिक खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर मंगळूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र 23 डिसेंबर 2014 रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून भाजप व आरएसएसशी संबंधित 21 जणांना अटक केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version