अनर्थ टळला! होमगार्ड्सची सतर्कता; रेल्वे रुळावरून वेळीच महिलेला चिमुकल्यासह केलं बाजूला

पतीसोबतच्या घरगुती भांडणाला वैतागून महिलेने बालकासह जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अनर्थ टळला! होमगार्ड्सची सतर्कता; रेल्वे रुळावरून वेळीच महिलेला चिमुकल्यासह केलं बाजूला
chalisgaon railway station

जळगाव : महिला होमगार्डमुळे चाळीसगाव रेल्वे स्थानकावर जीवन संपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेसह तिच्या लहान बालकाचे प्राण वाचवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीसोबतच्या घरगुती भांडणाला वैतागून महिलेने बालकासह जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. चाळीसगाव रेल्वे स्थानकावर काशी एक्सप्रेस आगमनाच्या वेळेस महिलेने बालकासह स्वतःला रेल्वे रुळावर झोकून दिले होते. त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या होमगार्ड महिलांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ रेल्वे रुळावर धाव घेत महिलेसह तिच्या बालकाचा जीव वाचवाला आहे. तीनही होमगार्ड महिलांनी रेल्वे रुळावर उतरून पीडित महिलेला प्लॅटफॉर्मवर चढवले. या तीनही महिला होमगार्ड चाळीसगाव येथून कर्तव्य पार पाडून पाचोऱ्याकडे परतत होत्या. ज्या महिलेने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला ती महिला धुळे येथील असल्याचे समजते. या घटनेनंतर महिलेची समजूत काढून तिला धुळ्याकडे रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून होमगार्ड महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; ICU मध्ये उपचार सुरू, रुग्णालयातून मोठी अपडेट समोर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number