पुण्याची पुनरावृत्ती! न्यायाधीशाच्या अल्पवयीन मुलाच्या मर्सिडीजची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू

न्यायाधीशाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव मर्सिडीजने दुचाकीला धडक दिली असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला.
पुण्याची पुनरावृत्ती! न्यायाधीशाच्या अल्पवयीन मुलाच्या मर्सिडीजची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू

केरळ: केरळमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. न्यायाधीशाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात मर्सिडीज कार चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं घडलं काय?
ही घटना रविवारी पहाटे केरळच्या एर्नाकुलम शहरात घडली. मृत व्यक्तीचे वय 54 वर्षे होते. ते खाद्यपदार्थांचा स्टॉल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शनिवारी रात्री स्टॉल बंद करून ते स्कूटरवरून घरी परतत असताना हा अपघात झाला.पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान भरधाव वेगात आलेल्या मर्सिडीज कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला असून अपघातस्थळी सामान विखुरलेले होते.

हेही वाचा – पुतण्याचा रक्तरंजित थरार! विहिरीच्या पाण्यावरून काका-काकूला संपवलं, हिंगोली हादरलं!

नातेवाईकांचा आरोप
मृत व्यक्तीच्या भाचीने सांगितले की, अपघातानंतर न्यायाधीश पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी अल्पवयीन मुलाला कार चालवण्याची परवानगी का दिली, असा सवाल केला असता न्यायाधीशांनी अपमानास्पद भाषेत उत्तर दिल्याचा आरोप तिने केला आहे.

पोलीस तपास सुरू
पोलिस तपासात अपघातातील मर्सिडीज कार न्यायाधीशांच्याच नावावर असल्याचे समोर आले आहे. कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स होते का, तसेच तो मद्याच्या प्रभावाखाली होता का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर-

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version