Ketan Aggarwal Death Case: केतन अग्रवालच्या मृत्यूचा सापळा रचनाऱ्यांची आता खैर नाही; कायद्याचा फास आवळण्यासाठी उज्ज्वल निकम मैदानात

पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठा निर्णय घेतला असून, या खटल्याची धुरा आता प्रख्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Ketan Aggarwal Death Case: केतन अग्रवालच्या मृत्यूचा सापळा रचनाऱ्यांची आता खैर नाही; कायद्याचा फास आवळण्यासाठी उज्ज्वल निकम मैदानात

Ketan Aggarwal Death Case:  लोणावळा येथील लोहगडावरून तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याला खाली ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, आता या संपूर्ण प्रकरणाला कायदेशीरदृष्ट्या मोठे वळण मिळाले आहे. 18 जून रोजी झालेल्या या दुर्दैवी मृत्यूचा छडा लावताना पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश केला होता. सुरुवातीला फोटो काढताना तोल जाऊन अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असताना, चौकशीअंती केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकरानेच त्याला 400 फूट खोल दरीत ढकलून दिल्याचे उघडकीस आले. या दोन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठा निर्णय घेतला असून, या खटल्याची धुरा आता प्रख्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

वडिलांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; खटला चालणार फास्ट ट्रॅक कोर्टात
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या मुलाला न्याय देण्याची आर्त साद घातली. या प्रकरणात आरोपींना फासावर लटकवण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवावा आणि सरकारतर्फे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी तातडीने मंजूर करत विधी व न्याय विभागाच्या सचिवांना यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. स्वतः ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनीही या केसचे वकीलपत्र स्वीकारण्यास संमती दर्शवली आहे. ‘या गुन्ह्यातील दोषींना कठोरतम शिक्षा करण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून अग्रवाल कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही,’ असे मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Jayant Patil: ‘राज्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट, कायदा-सुव्यवस्था धोक्यात…’; जयंत पाटलांचा सरकारवर थेट निशाणा

पोलिसांचा तपास वेगवान; मुख्य आरोपी सियाच्या भावाचीही कसून चौकशी
दुसरीकडे, या हत्येच्या कटाचा परीघ किती मोठा आहे, याचा शोध घेण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आपली पावले वेगाने उचलली आहेत. या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आता मुख्य आरोपी सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल याला चौकशीसाठी बोलावले आहे. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल गोयल याची गेल्या काही तासांपासून ठाण्यात कसून चौकशी केली जात असून त्याचा सविस्तर जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. 

साहिल सध्या पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देत असला, तरी अग्रवाल कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपांची दिशा पकडून पोलीस तांत्रिक व कागदोपत्री पुरावे गोळा करत आहेत. उज्ज्वल निकम यांची एन्ट्री आणि पोलिसांचा वाढता तपास यामुळे मुख्य आरोपी सिया गोयल हिच्यासमोरील अडचणी कमालीच्या वाढल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number