कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात महिला भाविकाला बेदम मारहाण! पुजाऱ्याच्या पत्नीवर आरोप, नेमकं काय घडलं?

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात महिला भाविकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
Kolhapur Ambabai Temple
Kolhapur Ambabai Temple

कोल्हापूरमधील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात महिला भाविकासोबत धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याने मंदिर परिसरातील या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेच्या चौकशीची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायली भोसले या आपल्या सासू, मुलगा आणि मैत्रिणींसोबत देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या होत्या. दर्शनासाठी आलेल्या या महिला मंदिरातील मुखदर्शन चौकात बसल्या असताना त्यांच्यात आणि प्रिया योगेश जोशी यांच्यात वाद झाल्याचा आरोप आहे.

जागा रिकामी करण्यास सांगितल्याचा आरोप

मंदिराच्या आवारात बसलेल्या महिलांना दहा मिनिटांत जागा रिकामी करण्यास सांगण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर वाद वाढला आणि सायली भोसले तसेच त्यांच्या सासू सुवर्ण भोसले यांच्यासोबत धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे. या घटनेचे दृश्य मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांकडे तक्रार दाखल

या प्रकरणी सायली भोसले यांच्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रिया योगेश जोशी यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संबंधित महिला मंदिरातील श्रीपूजक कुटुंबाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version