कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्याचा पहिला गुन्हा; लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्याचा पहिला गुन्हा जिल्ह्यातील गांधीनगर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला.

कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्याचा पहिला गुन्हा; लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्याचा पहिला गुन्हा जिल्ह्यातील गांधीनगर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला. कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम आरोपीने मैत्रीतून ओळख वाढवली, मग लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी कोल्हापुरातील गांधीनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पुंडलिक कोळी करत आहेत.

धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे काय?
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026 हाच धर्मांतर विरोधी कायदा आहे. याअंतर्गत कोणत्याही व्यक्तीचे बळजबरीने, धमकावून, फसवून, आमिष दाखवून, चुकीची माहिती देऊन किंवा लग्नाचे आमिष दाखवून धर्म बदलायला लावणे हा गुन्हा आहे. स्वेच्छेने धर्म बदलायचा असेल तर ६० दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना कळवावे लागते

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number