मध्य प्रदेशमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मूळ आरोपी आधीच एका गुन्ह्यासाठी पोलीस कोठडीत राहिला असून त्याला आता पुन्हा अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण मूलतः मालमत्ता नावावर करण्यावरून झाले होते. पती लखनने त्याची पत्नी ज्योतीची भर रस्त्यावर सर्वांसमक्ष अमानुषपणे हत्या केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशातील छतरपूर सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. लखन-ज्योतीने दहा वर्षांपूर्वी लग्न केलेलं, लखनना त्याच्या सासऱ्यांची जमीन आपल्या नावावर करून हवी होती. मात्र ज्योतीच्या आई-वाडिलांनी नकार दिला; त्यामुळे लखनने त्यांना मारहाण केली. या गुन्ह्यांतर्गत त्याला सर्वप्रथम अटक करण्यात आली होती. काही दिवसांनी त्याची सुटका झाली, सुटकेच्या दोनच दिवसांत लखनने ज्योतीची गळा चिरून हत्या केली.
ज्योती सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात असलेल्या एका भाड्याच्या घरात तिच्या चार आणि सहा वर्षांच्या मुलांसह राहत होती. ज्योती जवळच्याच एका हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती. ती चहापत्ती आणायला घरातून बाहेर पडली, तेव्हा तिचा नवरा लखन एका मित्रासोबत परिसरातील मुख्य रस्त्यावर आला. त्याने ज्योतीला रस्त्यावर फेकले, मग तिच्यावर बसून सर्वांसमोर गळ्यावर चाकूने अनेक वार केलेत. यावरच न थांबता त्याने तिची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराला उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.