NEET UG Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट; लातूरच्या केमिस्ट्री प्रोफेसरने पुण्यातून हलवले पेपरफुटीचे सूत्र, CBI ने आवळल्या मुसक्या

कुलकर्णी हा पेशाने रसायनशास्त्राचा (Chemistry) प्राध्यापक असून, नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

NEET UG Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट; लातूरच्या केमिस्ट्री प्रोफेसरने पुण्यातून हलवले पेपरफुटीचे सूत्र, CBI ने आवळल्या मुसक्या

NEET UG Paper Leak Case: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयला (CBI) मोठे यश आले आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या पी.व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत. कुलकर्णी हा पेशाने रसायनशास्त्राचा (Chemistry) प्राध्यापक असून, नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या अटकेमुळे पेपरफुटीचे धागेदोरे आता शिक्षण क्षेत्रातील मोठ्या साखळीपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यात चालवले जायचे विशेष कोचिंग क्लासेस
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पी.व्ही. कुलकर्णी याने यापूर्वी अटक करण्यात आलेली संशयित मनीषा वाघमारे हिच्यासोबत संगनमत करून हा कट रचला होता. या दोघांनी मिळून पुण्यात विद्यार्थ्यांसाठी विशेष 'कोचिंग क्लासेस' आयोजित केले होते. एप्रिल महिन्याच्या अखेरीस प्रश्नपत्रिका मिळवल्यानंतर, कुलकर्णीने या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे, विद्यार्थ्यांनी हे प्रश्न आपल्या वहीत हाताने लिहून घेतले होते, जे 3 मे रोजी झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेशी तंतोतंत जुळले.

हेही वाचा – Pune Hospital Bomb : हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचं प्रकरण! पुणे पोलिसांकडून मोठे खुलासे समोर; 'त्या' कारणास्तव बॉम्ब ठेवल्याची माहिती

लातूर कनेक्शन आणि पुणे येथून अटक
प्रा. पी.व्ही. कुलकर्णी हा मूळचा लातूरचा रहिवासी असून त्याचे शैक्षणिक वर्तुळात मोठे जाळे असल्याचे समजते. पुण्यातून त्याला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयने त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. पेपर नेमका कोठून आणि कसा लीक झाला, तसेच या व्यवहारात किती आर्थिक उलाढाल झाली, याचा शोध आता अधिकारी घेत आहेत. या कारवाईमुळे नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या रॅकेटमध्ये आणखी काही मोठ्या नावांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number