Crime News : होणाऱ्या नवऱ्याला खासगी फोटो दाखवण्याची धमकी; छळाला वैतागून लग्नाच्या आदल्या दिवशीच मुलीनं पालकांसोबत उचललं टोकाचं पाऊल

बंगळुरू : म्हैसूर जिल्ह्यातील टी. नरसीपुरा तालुक्यातील 'केम्पय्याना हुंडी' गावात एका 21 वर्षीय तरुणीचा आणि तिच्या पालकांचा मृतदेह त्यांच्याच घरी सोमवारी आढळून आला. विशेष म्हणजे, काही दिवसांतच या तरुणीचे लग्न होणार होते. संबंधित तरुणीचा छळ केल्याप्रकरणी आणि तिचे खासगी फोटो तिच्या होणाऱ्या पतीला (भावी पतीला) पाठवल्याप्रकरणी एका व्यक्तीवर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. […]

Crime News : होणाऱ्या नवऱ्याला खासगी फोटो दाखवण्याची धमकी; छळाला वैतागून लग्नाच्या आदल्या दिवशीच मुलीनं पालकांसोबत उचललं टोकाचं पाऊल

बंगळुरू : म्हैसूर जिल्ह्यातील टी. नरसीपुरा तालुक्यातील 'केम्पय्याना हुंडी' गावात एका 21 वर्षीय तरुणीचा आणि तिच्या पालकांचा मृतदेह त्यांच्याच घरी सोमवारी आढळून आला. विशेष म्हणजे, काही दिवसांतच या तरुणीचे लग्न होणार होते. संबंधित तरुणीचा छळ केल्याप्रकरणी आणि तिचे खासगी फोटो तिच्या होणाऱ्या पतीला (भावी पतीला) पाठवल्याप्रकरणी एका व्यक्तीवर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मृतांची ओळख शिवन्ना, त्यांची पत्नी नागरत्ना (वय 44) आणि त्यांची धाकटी मुलगी रक्षित (वय 21) अशी पटली आहे. रक्षितचे लग्न म्हैसूरमधील एका तरुणाशी होणार होते. त्यासाठी 23 व 24 जून या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या.

पोलिसांनी सांगितले की, त्यांनी एका ट्रॅक्टर चालक आरोपीला बंगळुरू येथून एका रात्रीच्या मोहिमेदरम्यान अटक केली. या कुटुंबाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांच्या मृत्यूसाठी संबंधित व्यक्तीला जबाबदार धरण्यात आले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कुटुंबाचा मित्र होता. तो त्या महिलेला वैयक्तिकरित्याही ओळखत होता. अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध असावेत आणि नंतर ते संपुष्टात आले असावेत, असा संशय आहे. नाते संपल्यानंतरही तो पुरुष त्या महिलेचा छळ करत होता. तिच्याकडे लग्नाची मागणी करत होता, असे अहवालात नमूद केले आहे.

हेही वाचा : Minister George Kurian : केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी दिला राजीनामा; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुपूर्द, हे कारण आलं समोर

अहवालानुसार, रक्षिताने आपल्या कुटुंबीयांना या छळाबाबत कल्पना दिली होती. तर गावकऱ्यांनी आरोपीला तिच्या आयुष्यात हस्तक्षेप न करण्याबाबत बजावण्यासाठी काही बैठकाही घेतल्या होत्या. तरीही, या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून त्याने तिचे खासगी फोटो प्रसारित करणे सुरूच ठेवले होते, असे समजते. अहवालानुसार, रविवारी गावकऱ्यांनी आरोपीला पुन्हा जाब विचारला आणि त्याच्या फोनवरून त्या महिलेचे फोटो डिलीट करायला लावले. त्याच संध्याकाळी, त्याने ते फोटो रक्षिताच्या होणाऱ्या पतीला पाठवले. त्याला फोन केला आणि तिच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली, असे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर काही वेळातच तिच्या कुटुंबीयांना या फोनबद्दल समजले, असेही अहवालात नमूद केले आहे. आरोपीच्या कृत्यामुळेच त्यांना आत्महत्येचे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले, असा दावा त्या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. तिच्या काकांनी पत्रकारांना सांगितले की, सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास कुटुंबीयांना या मृत्यूंची माहिती मिळाली. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर प्रशासनाने त्या भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number