Nagpur Crime News : इंस्टाग्रामवरील ओळख अन् 16 वर्षीय मुलीला 3 महिने ‘डिजिटल अरेस्ट’; अत्याचार…अमानुष छळामुळे मुलीची अवस्था पाहवेनाशी…

नागपूर : नागपूरमधून डिजिटल अरेस्टची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूर पोलिसांच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील एका 19 वर्षीय उच्चभ्रू तरुणाने इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तब्बल 3 महिने मोबाईल आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून 'डिजिटल अरेस्ट' करून ठेवले होते. तसेच या नराधमाने मुलीला नागपुरातील एका भाड्याच्या खोलीत डांबून ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. बेल्टने मारहाण […]

Nagpur Crime News : इंस्टाग्रामवरील ओळख अन् 16 वर्षीय मुलीला 3 महिने ‘डिजिटल अरेस्ट’; अत्याचार…अमानुष छळामुळे मुलीची अवस्था पाहवेनाशी…

नागपूर : नागपूरमधून डिजिटल अरेस्टची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूर पोलिसांच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील एका 19 वर्षीय उच्चभ्रू तरुणाने इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तब्बल 3 महिने मोबाईल आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून 'डिजिटल अरेस्ट' करून ठेवले होते. तसेच या नराधमाने मुलीला नागपुरातील एका भाड्याच्या खोलीत डांबून ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. बेल्टने मारहाण करत शरीरावर चाकूचे 20 हून अधिक वार करून अमानुष अत्याचार केल्याचेही समोर आले आहे.

आरोपीची ओळख निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे अशी झाली आहे. त्याने 'आकाश मेहरा' नावाचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून नागपुरातील 16 वर्षीय किशोरीशी मैत्री केली होती. मैत्रीनंतर आरोपीने तिचे काही आक्षेपार्ह आणि खाजगी फोटो मिळवले. यानंतर त्याने ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू केला. फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने सतत व्हिडिओ कॉल आणि धमक्यांच्या जोरावर मुलीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. सुमारे 2 महिन्यांपूर्वी आरोपीने मुलीला तिच्या घराच्या छतावर जाऊन व्हिडिओ कॉल करण्यास आणि त्यानंतर बेडखाली झोपण्यास भाग पाडले. मुलीने विरोध दर्शवताच फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने ती त्याच्या प्रत्येक हुकुमाचे पालन करत गेली. 

हेही वाचा : Crime News : पुरंदरमध्ये नसरापूर प्रकरणाची पुनरावृत्ती! चिमुरडीवर 60 वर्षीय नराधमाकडून अत्याचार; घरामागच्या बागेत घेऊन गेला अन्…

 नागपुरातील दिघोडी भागात एक फ्लॅट भाड्याने घेत तिथे त्याने मुलीला बंधक बनवून ठेवले. आरोपीने मुलीवर वारंवार बलात्कार केला. तसेच तिला मारहाण करण्यासाठी प्राण्यांचे पट्टे आणि स्ट्रॅप्सचा वापर केला. नागपूर पोलिसांनी शहरातील 2 पेट शॉप्समधून हे पट्टे खरेदी केल्याच्या माहितीला दुजोरा दिला असून दुकानदारांची चौकशी केली आहे. पीडित मुलीच्या शरीरावर चाकूचे 20 हून अधिक घाव आढळून आले असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तांत्रिक सर्व्हिलन्सच्या मदतीने 3 ऑगस्ट रोजी दिघोडी येथील भाड्याच्या खोलीवर धाड टाकली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा आरोपीने किशोरीच्या गळ्यावर थेट चाकू ताणून ठेवला होता. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number