नवरात्रीच्या तयारीत शोककळा! देवीची मशाल ज्योत घेऊन येणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

सर्वत्र नवरात्रीची तयारी सुरू असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे.
नवरात्रीच्या तयारीत शोककळा! देवीची मशाल ज्योत घेऊन येणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

सर्वत्र नवरात्रीची तयारी सुरू असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे देवीची मशाल ज्योत घेऊन येणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चितेपिंपळगाव शिवारातील धुळे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मृत तरुणाचे नाव सुरज राजपूत असून तो तुळजापूर येथून देवीची मशाल ज्योत घेऊन येत होता. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ जखमीला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा – अकोल्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कर्जफेडीच्या चिंतेत विहिरीत उडी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version