भिवंडीत शहरातील कामतघर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये 19 एप्रिल 2026 रोजी उपचारादरम्यान 33 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 5 महिन्यानंतर 1ऑक्टोबर रोजी नारपोली पोलिसांनी जिल्हा शक्य चिकित्सकांच्या वैद्यकीय समितीच्या अभिप्राय व अहवालानंतर पोलिसांनी पाच महिन्यांनंतर डॉक्टरांसह रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या मृत्यूला कारणीभूत असलेले cardiologist डॉक्टर अफान खान यांच्या विरोधात अटकेच्या कारवाईची मागणी कुटुंबियांनी केली असून नोबल हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याची मागणीही कुटुंबियांनी केली असून तसे न झाल्यास नारपोली पोलिस ठाण्या समोर बसून सर्वपक्षीयांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नितीन विश्वनाथ वाघमारे यांना 18 एप्रिल 2026 रोजी सकाळी छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी प्रथम डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर त्यांना कामतघर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉ. आफान खान यांनी तपासणी करून टू-डी इको आणि अँजिओग्राफी केली.
हेही वाचा- हृदयद्रावक! 7 वर्षीय मुलाचा खोडकरपणा अन् पत्नीने…; अखेर वडिलांनी घरातचं संपवलं जीवन
हृदयात लहान ब्लॉकेज असल्याचे सांगून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉ. आफान खान तेथून निघून गेले. त्यानंतर अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी फोनवरून मिळालेल्या सूचनांनुसार उपचार केले. 19 एप्रिल रोजी नितीन यांची प्रकृती खालावली. त्यांना रक्ताची उलटी झाल्याचे आणि पुढील उपचारासाठी व्हेंटिलेटरची गरज असल्याचे नातेवाइकांना रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मात्र, त्याच दिवशी सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.या मृत्यूप्रकरणी नातेवाइकांनी उपचारात हलगर्जीपणा झाल्याची तक्रार केली होती.
पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान उपचारांची कागदपत्रे जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली होती. 27 ऑगस्ट 2026 रोजी प्राप्त झालेल्या अभिप्रायात उपचार करणाऱ्या हृदयरोगतज्ज्ञांच्या कामात निष्काळजीपणा दिसून येत असल्याचे तसेच रुग्णालय व्यवस्थापनाने अपेक्षित दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली नसल्याचे नमूद करण्यात आले. या अभिप्रायाच्या आधारे नारपोली पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक राहुल पाटील यांनी संबंधित डॉक्टर अफान खान आणि रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नारपोली पोलीस करीत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.