रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाला शिवीगाळ करत मारहाण; नेमकं प्रकरण काय?

पिंपरी चिंचवड येथील वाय. सी. एम. हॉस्पिटलमध्ये बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस शिपायाला रुग्णांच्या मित्रांकडून जबर मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाला शिवीगाळ करत मारहाण; नेमकं प्रकरण काय?

पिंपरी चिंचवड शहरातील कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाला रुग्णांच्या मित्रांनी शिवीगाळ करून, जबर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नेमके काय घडले?
वाय सी एम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रुग्णावर उपचार करत होते, दरम्यान त्यांच्या कामात व्यत्यय येऊ नये व उपचार योग्यरीतीने व्हावे म्हणून, पोलीस शिपायाने उपस्थित संबंधित रुग्णाच्या मित्रांना ‘अडथळा आणू नका’ असे सांगितले. यावर मित्रांनी पोलीस शिपायाला शिवीगाळ केली. तसेच त्याला धमकावून जबर मारहाण केली.

हेही वाचा – काळाचा घाला! नाशिकमधील चार भाविकांचा दुर्दैवी अपघात; 4 जणांचा मृत्यू, काही जण गंभीर जखमी

या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन मध्ये तीन आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव सुभाष साळुंखे वय 32 वर्ष, कुशाल नयना गोयल वय 28 वर्ष आणि सोहेल साबीर शेख वय 27 वर्ष या तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

या घटनेमुळे नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्याच सुरक्षेचा आणि त्यांच्या कार्यावरील विश्वासार्हतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची दखल घेत पोलीस तपास सुरु आहे.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर –

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version