Tuesday, March 17, 2026 02:54:48 PM

Pune : अचानक मोठा आवाज आला अन् रक्ताच्या थारोळ्यात दिसली तरुणी; पुण्यात धक्कादायक प्रकार

पुण्यात वाघोलीत इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

pune  अचानक मोठा आवाज आला अन् रक्ताच्या थारोळ्यात दिसली तरुणी पुण्यात धक्कादायक प्रकार

पुण्यात वाघोलीत इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून 18 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. ही घटना काल दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास भावडी रोडवरील एका सोसायटीमध्ये घडली आहे. अद्याप आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले असून सारा लालमन अंधारे ( वय 18, सध्या रा. वाघोली, मूळ रा. करमाळा, ता. सोलापूर ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

हेही वाचा- Chembur Accident : चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना!इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडले 6 कामगार

सारा हिने आठव्या मजल्यावरील रिफ्युज गॅलरीमधून खाली उडी घेतली. ती  12.30 च्या सुमारास लिफ्टने आठव्या मजल्यावरील रिफ्युज गॅलरीमध्ये आली. तिथे तिने चप्पल काढली व सरळ खाली उडी टाकली. अचानक मोठा आवाज झाल्याने सोसायटीतील नागरिकांनी बघितले असता सारा ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी त्वरित पोलिसांना कळवून तिला खाजगी रुग्णालयात हलविले. मात्र एवढ्या वरून खाली कोसळल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. ती 11 वी इयत्तेत शिकत होती. ती मूळची सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील असल्याचे कळते. मात्र वर्षभरापासून ती आईसह मामाकडे राहत होती. दरम्यान पोलिस अधिक तपास करत आहेत. 


सम्बन्धित सामग्री