पुणे: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये काही विद्यार्थ्यांनी कोयत्याने आणि हातोड्याने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. या घटनेत 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: शिवसेनेच्या 'या' बड्या नेत्याचं शिंदेंना पत्र
नेमकं प्रकरण काय?
माहितीनुसार, ही घटना पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये घडली आहे. यादरम्यान, काही विद्यार्थ्यांनी कोयत्याने आणि हातोड्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यासंदर्भात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये कोयते आलेच कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यासोबतच, या घटनेमुळे शिक्षण संस्थेवरचा विश्वास डगमळीत होत आहे. विद्यार्थ्यांचा हा राडा नेमका कशावरुन झाला? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.