Thursday, July 17, 2025 01:27:26 AM

वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता अन् अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार; पुण्याजवळ हे काय घडलं?

विठुरायाला भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. अशातच, एक संतापजनक बातमी समोर आली आहे.

वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता अन् अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार पुण्याजवळ हे काय घडलं

रोहन कदम. प्रतिनिधी. पुणे: विठुरायाला भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. 'माऊली माऊली'चा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपूरला निघाले आहेत. अशातच, या वारीदरम्यान एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. काही गुंडांनी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांना लूबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकच नाही नाही, तर वारकऱ्यांसोबत असणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचारही केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: शक्तिपीठ महामार्ग लोकांची की सत्ताधाऱ्यांची गरज? - बच्चू कडू

पहाटे वारकऱ्यांसोबत हे काय घडलं?

सोमवारी रात्री वारकऱ्यांची एक गाडी देवदर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. वारकऱ्यांमध्ये काही पुरुष, महिला आणि तरुणी सुद्धा होत्या. मंगळवारी पहाटे 4:30 वाजता चहा पिण्यासाठी वारकऱ्यांनी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे गाडी थांबवली. मात्र, तेवढ्यात दुचाकीवर दोनजण आले. इतकच नाही तर त्यांनी सर्वांना कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांनी वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकली. यासह त्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकाऊन घेतले. 

हेही वाचा: महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा मार्ग मोकळा

आधी लुटलं... नंतर लैंगिक अत्याचार

मात्र, एवढ्यावर विकृत मानसिकतेचे आरोपी थांबले नाहीत. त्यांची नजर 17 वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर गेली. या नराधमांनी कोयत्याचा धाक दाखवत तिला टपरीच्या मागे नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हे सगळं झाल्यावर संबंधित आरोपी पळून जातात आणि इतकं सगळं होऊनही पोलिसांना ते सापडत नाहीत. विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे जाणारा वारकरी सुद्धा आता सुरक्षित नाहीये का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. 
 


सम्बन्धित सामग्री