MPSC Paper Leak: 25 पानांचे PDF, रात्रीच मेसेज अन्…; जिच्यासाठी खटाटोप केला, तिने गरज संपताच नातं तोडलं! प्रेमभंगाच्या रागात पठ्ठ्याने पोलिसांनाच टिप दिली

एमपीएससीच्या औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश असून यात आता महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे.

MPSC Paper Leak: 25 पानांचे PDF, रात्रीच मेसेज अन्…; जिच्यासाठी खटाटोप केला, तिने गरज संपताच नातं तोडलं! प्रेमभंगाच्या रागात पठ्ठ्याने पोलिसांनाच टिप दिली

औषध निरीक्षक, गट-ब संवर्गाची चाळणी परीक्षा 22 मार्च 2026 रोजी झाली होती. परीक्षेच्या काही दिवस आधीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नसंचातील काही प्रश्न मिळवून स्वतंत्र प्रश्नसंच तयार केल्याचा आरोपासह हा प्रश्नसंच पुढे इतर व्यक्तींना देण्यात आल्याची माहिती यावेळी समोर आली होती. एमपीएससीच्या औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश असून यात आता महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे.

 गर्लफ्रेण्डसाठी काहीतरी करायला पाहिजे, या भावनेने एका तरुणाने एमपीएससीच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करत औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेचे काही प्रश्न प्रेयसीला मिळवून दिले. तरुणी औषध निरीक्षक होतााच तिने त्याच्यासोबत ब्रेकअप केलं. प्रेमभंगाच्या रागात प्रियकराने थेट पोलिसांना या प्रकरणाची टिप देऊन पर्दाफाश केला. या प्रकरणातील आरोपी गौरव पाटील आणि त्याची परीक्षार्थी मैत्रीण ऋतुजा पाटील यांच्यातील व्हॉट्स ॲपवरील चॅट समोर आले आहेत. 20 मार्च रोजी ऋतुजाने गौरवला पाठवलेल्या व्हॉट्सॲप चॅटमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. प्रवीण पाटीलने MPSC च्या कर्मचाऱ्यांकडून पेपर मिळवून तो तब्बल 20 लाखांना विकल्याचा आरोप आहे.

हेही वाचा- Narhari Zirwal On Adivasi Student Protest: ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’, झिरवळांच्या सल्ल्यावर विद्यार्थ्यांची नाराजी; म्हणाले, “…तर तुम्ही आलेच नसते”

लोकेश ऊर्फ गौरव पाटील याने एमपीएससीला याबाबत माहिती दिल्यानंतर प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. प्राथमिक चौकशीत एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर मोबाइल फोन, संभाषण, पैशांचे व्यवहार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाला वेग आला. पेपरफुटीप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एमपीएससीचे तीन अधिकारी सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, अवर सचिव अभिजित लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत.

त्याचसोबत कौटिल्य अकादमी, नंदुरबारचे संचालक प्रवीण दिलीप पाटील यांना अटक केली असून त्यांच्यासोबत या प्रकरणात परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि लोकेश ऊर्फ गौरव राजेंद्र पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) अधिनियम 2024, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार यासर्व आरोपींवर कारवाई केली जाणार आहे. 

हेही वाचा- Samay Raina And Devendra Fadnavis Video: ‘मी हे बिस्कीट घेऊ?’ समय रैनाने असं काही केलं की मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना; पाहा मजेशीर Video

यावेळी पोलिस उपायुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असून मालमत्ता कक्षाचे मंगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कारवाई मालमत्ता कक्षाचे मंगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने केली कारवाई. सर्व सहा आरोपींना बुधवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाकडून सर्व आरोपींना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची मोठी कारवाई झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number