रत्नागिरीत काळीज पिळवटणारी दुर्घटना; खाडीत बुडून एकाच कुटुंबातील 3 मुलांचा मृत्यू, 1 बेपत्ता

रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे रविवारी दुपारी काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

रत्नागिरीत काळीज पिळवटणारी दुर्घटना; खाडीत बुडून एकाच कुटुंबातील 3 मुलांचा मृत्यू, 1 बेपत्ता

योगेश बांडागळे, रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे रविवारी दुपारी काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. खाडीत कालवे काढण्यासाठी आई-वडिलांसोबत गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच मुलांपैकी चार निष्पाप मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघांचे मृतदेह हाती लागले असून, एका 15 वर्षीय मुलीचा शोध सुरू आहे.  इंगळवाडी येथील भाटकर कुटुंब रविवारी दुपारी 3:30 वाजता खाडीत कालवे काढण्यासाठी गेले होते. आई-वडील कालवे काढत असताना दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास पाण्यातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने पाचही मुले एकापाठोपाठ खोल पाण्यात ओढली गेली.

हेही वाचा – घरात पत्नीच्या मृत्यूचं दुःख; पतीने आजीशीच थाटला संसार, पुढे जे घडलं ते हादरवणारं

मुलांचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी तातडीने धाव घेतली. यामध्ये एका मुलीला वाचवण्यात यश आले, मात्र उर्वरित चार जणांना वाचवताआले नाही. मृतांची नावे मोहम्मद जुनेद भाटकर (6)जुहेरिया जुनेद भाटकर (9)बुशिरा जुनेद भाटकर (11)माहिरा जुनेद भाटकर (15) (शोध सुरू) अशी आहेत.

घटनेची माहिती मिळताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बेपत्ता माहिराचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. एकाच कुटुंबातील चार चिमुकले बुडल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे इंगळवाडीसह संपूर्ण नाणार परिसरावर शोककळा पसरली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number